Maharashtra Politics top 5 News : शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर बाबात आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत नव्या शंका उपस्थित केल्या आहेत.

१) “अजितदादांच्या अपघाताला सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी जबाबदार असू शकतं”; रोहित पवारांनी का व्यक्त केला संशय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला अपघात झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात आहे की घातपात हा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी आज पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. … वाचा सविस्तर…

२) देवेंद्र फडणवीस यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृहखात्याचा त्याग केला पाहिजे, संजय राऊत यांची टीका

अहिल्या नगरमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर अॅसिड फेकल्याची घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी गृहखातं सोडलं पाहिजे असंही राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर….

३) …तर काँग्रेस बारामतीची निवडणूक लढवणार! विजय वड्डेट्टीवारांनी स्पष्ट केला भूमिका

“राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तयार नसेल, तर काँग्रेस पक्ष या जागा लढण्याचा विचार करेल! बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका घेतली त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून, याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तयार नसेल तर ती निवडणूक लढवण्याबबत काँग्रेस पक्ष विचार करेल,” अशी पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर केली आहे.

४) एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरू? उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण

ज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यवर गेले, यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला देखील गेले होते. मात्र या भेटीनंतर शिवसेना ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“एकनाथ शिंदे हे दिल्लीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते, त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. ते अधिवेशनासाठी जातात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांची भेट घेतली आहे. साहेबांची भेट ही खासदारांबरोबर होती,” असे उदय सामंत म्हणाले.

“एकनाथ शिंदे हे खासदारांनाच भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. याचे औचित्य साधून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेतली. मी नक्कीच आज पहाटेपर्यंत दिल्लीत होतो. पण मी ज्या कामासाठी गेलो होतो तेथे कुठे टायगर ऑपरेशन चालू आहे, किंवा मी पिंजरा घेऊन गेलो होतो…असं काही नाही. आमच्या विभागाच्या संदर्भात बैठकीसाठी मी गेलो होतो. त्यामुळे टायगर ऑपरेशन कुठे आणि कसं चालू आहे याबाबत मला काही कल्पना नाही,” असे उदय सामंत म्हणाले.

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहिती नाही, पण काँग्रेसचे अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काही नाही. पण साहेबांचा दौरा हा शंभर टक्के खासदारांना भेटण्यासाठी होता, असेही उदय सामंत म्हणाले.

५) “अपघातामागे नक्कीच कोणती तरी मोठी शक्ती,” रोहित पवारांची पोस्ट

अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करु दिली जात नाही. याबाबत विस्तृत चर्चेची मागणी कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडं केली होती. आज हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा असताना अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली पण या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिलं गेलं नाही, याचा अर्थ काय? यावरुन या अपघातामागे नक्कीच कोणती तरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळं आमच्या संशयाला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. सरकारने अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही… अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू..!