Maharashtra Politics Updates : आज १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सर्वच पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आप-आपल्या भूमिका मांडत आहेत. या चर्चांच्या अनुषंगाने आज हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलिनीकरण करावेच लागेल’, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. या घडामोडी सुरू असताना आज मुंबई महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, आज आपण दिवसभरातील पाच महत्त्वाची वक्तव्य काय आहेत? जाणून घेऊयात.

Live Updates
17:51 (IST) 7 Feb 2026

Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांना अर्थखातं का मिळालं नाही? सुनील तटकरेंचं पहिल्यांदाच मोठं भाष्य; म्हणाले, ‘तो निर्णय…’

Sunil Tatkare On Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली. मात्र, अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या तरी देण्यात आलेलं नाही. त्यामुळे यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 7 Feb 2026

Ola Uber Strike : ओला-उबेर-रॅपिडो चालकांच्या संपावर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मालकांवर…

ओला, उबेर आणि रॅपिडो या अॅप-आधारित टॅक्सी व दुचाकी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या चालकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. या संपाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले असून संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, असे त्यांनी म्हटले.

सविस्तर वाचा

16:11 (IST) 7 Feb 2026

‘‘रोहित पवारांना बोलण्याचे स्वातंत्र्य; पण दादांच्या निधनाचे राजकारण नको…!’’

‘अजितदादा नाहीयेत. त्याचा आपापल्या पद्धतीने आपापल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये, सत्य काय ते लवकरच समजेल. मुख्यमंत्री या प्रकरणात स्वत: लक्ष घालत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यातील डेटाचे विश्लेषण होईल आणि त्यानंतर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि इतरांना बोलायचे स्वातंत्र्य आहे. शेवटी, त्यांचे काही म्हणणे असल्यास ते मांडतील,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगितले.

सविस्तर वाचा

16:10 (IST) 7 Feb 2026

Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाचं ठरलं! भाजपकडून रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर

Ritu Tawde BJP Mayor Candidate: महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीस अखेर स्पष्टता मिळाली असून भारतीय जनता पक्षाने महापौर पदासाठी रितू तावडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना आता या घोषणेनंतर पूर्णविराम मिळाला असून भाजपने अनुभवी आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत चेहऱ्यावर विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा

16:09 (IST) 7 Feb 2026

Anjali Damania : “भोगा आपल्या कर्माची फळं”, खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत

Anjali Damania Post on Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणी सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सदरचा कठर निर्णय घेतला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजदली दमानिया यांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 7 Feb 2026

Hasan Mushrif on NCP Merger : “सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर…”, हसन मुश्रीफ यांचं महत्त्वाचं विधान

Hasan Mushrif on NCP Merger: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट यांचे विलीनीकरण होणार की नाही? या मुद्दा कळीचा बनला आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी १२ फेब्रुवारीला या विषयात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडणार असल्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचेही महत्त्वाचे विधान समोर आले आहे.

सविस्तर वाचा