जयंत पाटील नाराज आहेत?; अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले…

“एक मिनिटं… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर…”

ajit pawar press confernce
पुण्यात आढावा बैठकीनंतर बोलताना अजित पवार.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुख्य सचिव कुंटे यांच्या पाटील नाराज असल्याचं बोललं जात असून, वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचं बोललं गेलं. या संपूर्ण वादावर मौन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

जयंत पाटलांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारमध्ये फूट?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. याबैठकीत करोना उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना जयंत पाटील नाराज असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं.

अजित पवार म्हणाले, “एक मिनिटं… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचं उत्तर जयंत पाटीलच देतील. जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह मंत्रालय सांभाळलं. ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा कडक बोलणार मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहेत. या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे,” असं म्हणत अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra politics jayant patil disappoint ajit pawar mahavikas aghadi bmh