Maharashtra Breaking News Updates : राज्याच्या राजकारणात विविध राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पाचपैकी केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागल्याने भाजपा आणि शिंदे शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे कोल्हापुरातील ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत देखील मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. तसेच मुंबईतील एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते आणि यावेळी तिन्ही नेत्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य करत जोरदार राजकीय टोलेबाजी केली, सध्या याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

एमआयएमचे (AIMIM) नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलील यांना एका पत्राद्वारे ही धमकी दिली असून, त्यात ‘तुमची सुपारी देण्यात आली आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

16:29 (IST) 30 Oct 2026

जेन-झी भाजपपासून दूर; कराळेंना पहिली पसंती, दुसऱ्या पसंतीत काँग्रेसला कौल!

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरुण म्हणजेच जेन-झी (Gen-Z) मतदारांनी प्रस्थापित भाजपला मोठा धक्का देत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना पसंती दर्शवली. ...सविस्तर बातमी
16:22 (IST) 30 Oct 2026

राष्ट्रवादीतील हकालपट्टीनंतर पुढील राजकीय भूमिका काय? नितेश कराळेंनी दिले मोठे संकेत

पुढील राजकीय वाटचालीबाबत नितेश कराळे मास्तर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याऐवजी स्वतंत्र संघटन उभारून युवकांना नवे व्यासपीठ देण्याचा विचार त्यांच्या समर्थक युवकांनी मांडला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोजकेच मात्र सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणूकही लढवण्याचा आग्रह युवकांनी धरला आहे. दरम्यान, सहा जिल्ह्यांचा आभार दौरा करून कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे नितेश कराळे मास्तर यांनी स्पष्ट केले आहे.

16:17 (IST) 30 Oct 2026

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीच्या तोंडावर पीएम किसान निधीचे १८३५ कोटी खात्यात जमा

देशातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
16:07 (IST) 30 Oct 2026

'एसआयआर'ला पुन्हा मुदतवाढ, १३ नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी मोहिम राबविली जात आहे. ...अधिक वाचा
15:49 (IST) 30 Oct 2026

विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; खो खो प्रशिक्षक, विद्यालयाच्या प्राचार्याविरोधात गुन्हा

प्रशिक्षणादरम्यान मैदानावर हॅलोजन बल्ब लावण्याचे काम प्रशिक्षणार्थी मुलांकडून केले जात असताना ही घटना घडली. ...सविस्तर बातमी
15:46 (IST) 30 Oct 2026

वडिलांचा मतदारसंघ राखण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी का ठरले? विजय वडेट्टीवार यांची टीका

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...सविस्तर बातमी
15:26 (IST) 30 Oct 2026

समृद्धी महामार्गावर आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट! हजारो शेतकरी व शिवसैनिक उतरले रस्त्यावर

दुष्काळग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...सविस्तर वाचा
15:18 (IST) 30 Oct 2026

डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकातील खराब रस्त्यावर रबराचे अस्तरीकरण

नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू प्राधिकरणाकडून रात्रौ दुरुस्तीचे काम सुरू ...सविस्तर बातमी
15:16 (IST) 30 Oct 2026

नागपुरात DRI ची मोठी कारवाई! तब्बल २.४० कोटींचे 'एम्फेटाईन' ड्रग्ज जप्त; बंगळुरूच्या दोन तरुणांना अटक

केंद्रिय महसूल गुप्तचर यंत्रणेने (DRI) नागपूर जिल्ह्यातील भागेमारी पथकर नाक्यावर मोठी कारवाई करत बंगळुरूच्या दोन तरुणांना ३ किलो एम्फेटाईन या घातक अमली पदार्थासह अटक केली आहे. ...अधिक वाचा
15:13 (IST) 30 Oct 2026

मुंबई–नागपूर नवीन विशेष रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा; जळगाव जिल्ह्यात कुठे असेल थांबा?

मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील प्रवाशांसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या मागणीला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ...सविस्तर बातमी
15:11 (IST) 30 Oct 2026

डोंबिवलीत घराबाहेर चप्पल स्टॅन्ड ठेवण्यावरून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

घराबाहेर चप्पल स्टॅन्ड ठेवण्यावरून एका ६२ वर्षाच्या गृहस्थाला ४५ वर्षांच्या व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीत घडली. ...अधिक वाचा
15:01 (IST) 30 Oct 2026

कोस्टल रोडवर अल्पवयीन मुलाने बीएमडब्ल्यू धडकवली; वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल

मोटार चालविणाऱ्या १७ वर्षीय मुलाकडे वैध वाहनचालक परवाना नसतानाही त्याला वडिलांनी मोटार चालविण्यास दिल्याचा आरोप आहे. अपघातावेळी मुलगा आणि त्याचा मित्र अमली पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...अधिक वाचा
15:00 (IST) 30 Oct 2026

राष्ट्रवादीतील हकालपट्टीनंतर पुढील राजकीय भूमिका काय? नितेश कराळेंनी दिले मोठे संकेत

पुढील राजकीय वाटचालीबाबत नितेश कराळे मास्तर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याऐवजी स्वतंत्र संघटन उभारून युवकांना नवे व्यासपीठ देण्याचा विचार त्यांच्या समर्थक युवकांनी मांडला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोजकेच मात्र सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणूकही लढवण्याचा आग्रह युवकांनी धरला आहे. दरम्यान, सहा जिल्ह्यांचा आभार दौरा करून कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे नितेश कराळे मास्तर यांनी स्पष्ट केले आहे.

14:46 (IST) 30 Oct 2026

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२वा आरोपी अटकेत; आर्थिक व्यवहारांची साखळी तपासणार

अमन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा तालुक्यातील रोहणा गावातून ताब्यात घेण्यात आले. ...सविस्तर वाचा
14:28 (IST) 30 Oct 2026

प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक, १२.९३ कोटींचा खर्च; ८० सुरक्षारक्षकांची नियुक्ती

भारतातील 'मराठा मिलिटरी लँडस्केप' या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. ...सविस्तर बातमी
14:27 (IST) 30 Oct 2026

दुष्काळातही हापूसचा गोडवा! देवगडचा आंबा ऑक्टोबरमध्येच मुंबई एपीएमसी बाजारात दाखल; सहा डझनांची पहिली पेटी दाखल, दिवाळी पाडव्याला आणखी पेट्यांची आवक

कोकणात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आंब्याचा मोहोर टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. ...सविस्तर वाचा
14:19 (IST) 30 Oct 2026

वानखेडेवरील ड्रोन शोमधील दोन ड्रोन चर्चगेट स्थानकात कोसळले; प्रवासी जखमी

वानखेडे स्टेडियमवर जिओ प्लॅटफॉर्म्सच्या समभागविक्रीच्या निमित्ताने ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील दोन ड्रोन नियंत्रणाबाहेर गेल्याने ते जवळच असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर कोसळले. ...सविस्तर वाचा
14:19 (IST) 30 Oct 2026

“कुंभमेळ्याच्या पवित्र जागी मांस मच्छीची दुकाने…”, महंत मुरलीदास महाराज संतप्त

एकिकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाने नांदी होणार असताना, कुंभमेळ्याची संथ कामे हा संत, महंतांच्या नाराजीचा विषय झाला आहे.  ...वाचा सविस्तर
14:06 (IST) 30 Oct 2026

Video : "कर्ज थकलं म्हणून माणुसकीही संपली का?", बच्चू कडूंनी हातोड्याने तोडले फायनान्स कंपनीने शेतकऱ्याच्या घराला लावलेले कुलूप

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे फायनान्स कंपनीने थकीत कर्जापोटी ६० टक्के दिव्यांग शेतकऱ्याच्या घराला लावलेले सील आमदार बच्चू कडू यांनी हातोड्याने तोडले. ...सविस्तर बातमी
14:06 (IST) 30 Oct 2026

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी १६ तास बंद

कल्याण डोंबिवली पालिकेकडून डोंबिवली शहराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. ३) बंद ठेवण्याचा निर्णय पालिका पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. ...सविस्तर वाचा
14:06 (IST) 30 Oct 2026

डोंबिवलीत निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र शिबिरांचे आयोजन

डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निवृत्तीवेतनधारकांसाठी १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मोफत जीवन प्रमाणपत्र व नेत्रतपासणी शिबिर भरवण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
14:06 (IST) 30 Oct 2026

डोंबिवलीत गांधीनगर ते नांदिवली नाला सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी

डोंबिवलीतील सुनीलनगर भागात रस्ता काँक्रिटीकरण व बंद असलेले पालिका वाहनतळ सुरू करण्याची माजी नगरसेवक भगवान पाटील यांची आयुक्तांकडे मागणी. ...वाचा सविस्तर
14:00 (IST) 30 Oct 2026

वाशिममध्ये ठाकरे गटाचा मोर्चा, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांना सरसकट एक लाखाची मदत द्या, तसेच आता सरकारने शेतकऱ्यांना दिलेली पाच हजारांची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासह विविध मागण्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सेनेने वाशीमध्ये मोर्चा काढाला होता. यावेळी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

13:38 (IST) 30 Oct 2026

बीड: संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटलवर छापा, बनावट डॉक्टरास अटक

शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना काही व्यक्ती लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली होती. ...अधिक वाचा
13:36 (IST) 30 Oct 2026

महाराष्ट्रासह सहा राज्यांत SIR ला मुदतवाढ, आता अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

राज्यात राबविण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना तसेच मतदारांचे येणारे आक्षेप दूर करण्यासाठी या प्रक्रियाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी आता ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. याबाबतची माहिती एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने दिली आहे.

https://twitter.com/ECISVEEP/status/2116010432221901148

13:28 (IST) 30 Oct 2026

सहकारमहर्षींची स्मृती जपण्यासाठी नांदेडमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र! नव्या रुग्णालयास श्यामराव कदम यांचे नाव देण्याची मागणी

नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक या गावच्या परिसरात वरील रुग्णालयाच्या उभारणीसाठी शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रयत्न तसेच पाठपुरावा केला होता. ...वाचा सविस्तर
13:25 (IST) 30 Oct 2026
वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा, समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा

शेतकऱ्यांना सरसकट एक लाखाची मदत द्या, तसेच आता सरकारने शेतकऱ्यांना दिलेली पाच हजारांची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासह विविध मागण्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सेनेचा वाशीमध्ये मोर्चा निघाला असून समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.

13:19 (IST) 30 Oct 2026

औंढा नागनाथच्या जुन्या बसस्थानक परिसरात आग, सहा दुकाने भस्मसात

औंढा नागनाथच्या जुन्या बसस्थानक परिसरात विविध प्रकारची दुकाने आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास यातील एका दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ...वाचा सविस्तर
13:11 (IST) 30 Oct 2026

बावनकुळेंनी जबाबदारी स्वीकारली, इतरांचे काय ?

नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवासाठी जबाबदार कोण ? याची चर्चाही सुरू झाली आहे. ...अधिक वाचा
13:01 (IST) 30 Oct 2026

शिरूरमध्ये भीषण अपघात! कीर्तन ऐकून घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव वाहनाची धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे येथे हरिनाम सप्ताहातील कीर्तन ऐकून पायी घरी परतणाऱ्या भाविकांना अज्ञात भरधाव वाहनाने चिरडले. ...सविस्तर बातमी

Devendra Fadnavis Mishkil Remark Raj Thackeray

“माझं नाक, कान मोठे दाखवा, पण पोट..”; फडणवीसांची मिश्किल टिप्पणी, राज ठाकरेंना विनंती केल्याचा सांगितला किस्सा, (Photo-CMO Maharashtra)