Maharashtra Politics : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. यातच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे भिवंडीत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असून भिवंडीत काँग्रेसचा महापौर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात नेमकं काय घडलं? पाच राजकीय महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
Chhagan Bhujbal : दोन्ही राष्ट्र्वादीत जुंपली? रोहित पवारांच्या ‘त्या’ दाव्याची भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “कोण कुठल्या…”
Chhagan Bhujbal On Rohit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला होता.
राज्यातील किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय कोणामुळे?…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती
आधी रोहित पवार, मग जय पवार आणि आता सुप्रिया सुळेंचीही अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पोस्ट; म्हणाल्या, “अनेक शंका-कुशंका..”
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन विविध मुद्द्यांची मांडणी केली. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही तपास यंत्रणा ढिम्म असून तपासाला वेग आलेला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत तपासाबाबत मत व्यक्त केले आहे.
राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेनेच्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते…”
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली ? या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? यासंबंधी वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यादरम्यान या भेटीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यादरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
ठरलं! भिवंडीत काँग्रेसचा महापौर होणार, हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितला फॉर्म्युला
भिवंडीत काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीही साथ लाभली. मात्र सत्तास्थापनेसाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे मागचे २५ दिवस महापौर कुणाचा होणार? याचा फैसला होत नव्हता. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी भिवंडीत काँग्रेसचा महापौर होईल असं सांगत नेमका फॉर्म्युला काय असेल हेदेखील स्पष्ट केलं आहे.

