Maharashtra Politics : राज्यात महापालिकांच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर आज भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपाचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले आहेत. या प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडीतील बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची मोठी चर्चा सुरू होती. अखेर या भेटीवर आता खुद्द राज ठाकरे यांनी खुलासा करत भेटीचं कारण सांगितलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिवसभरात नेमकं काय घडलं? पाच राजकीय महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
Ajit Pawar plane crash investigation: ‘ते’ दोन पायलट कुठे? संशयाचे ढग गडद; बस एवढीच माहिती मिळाली, तर…
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवरच काही नेते, आमदारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अजित पवार यांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले ते दोन पायलट कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. बसं एवढीच माहिती मिळावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली
काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा बंडखोर ठरला भिवंडीचा महापौर, भाजपचे सहा नगरसेवक फुटले; शिंदे सेनेला धक्का
Bhiwandi Mayor Election: भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठींबा दिला. यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या सहा नगरसेवकांनी मतदान केले. यामुळे चौधरी यांचा ४८ मतांनी विजय झाला. शिंदेंच्या सेनेने शेवटच्या क्षणी डाव टाकला पण, भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याने चौधरी यांना अनपेक्षित पाठबळ मिळाले आणि अखेर ते विजयी ठरले.
Devendra Fadanvis: “२०३० मध्ये मोदींच्या नेतृत्वात आग्रा किल्ल्यात ४०० वी शिवजयंती साजरी करु”; मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadanvis Agra Shivjayanti 2026 Speech: स्वातंत्र्यानंतर सात दशकं मुघलांच्या इतिहासावर अधिक भर दिल्यानंतर, सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमात मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “२०३० मध्ये मोदींच्या नेतृत्वात आग्रा किल्ल्यात ४०० वी शिवजयंती साजरी करु”, असे सूचक वक्तव्यही फडणवीस यांनी गुरुवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त आग्रा येथे बोलताना केले.
Raj Thackeray : राज ठाकरे एकनाथ शिंदेंना का भेटले? कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? मनसे प्रमुखांनी केला खुलासा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ येथे झालेल्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. इतकेच नाही तर या भेटीनंतर शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यातील युतीची चर्चा रंगू लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता स्वतः राज ठाकरे यांनी या भेटीत एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.
Ravindra Chavan : भिवंडीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार? रवींद्र चव्हाणांचा इशारा; म्हणाले, “पक्षाच्या विरोधात…”
Ravindra Chavan On Bhiwandi Mayor Election : राज्यात महापालिका निवडणुकीनंतर अद्यापही काही महापालिकांच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
