Maharashtra Politics Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आप-आपल्या भूमिका मांडताना दिसत आहेत. यातच सात राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपत असून यामध्ये शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेत जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात आज शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं. राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांची भूमिका काय? याचा खुलासा संजय राऊतांनी केला.

दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने कारवाई करत एका लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बचावासाठी आता आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, यासह आज दिवसभरातील पाच महत्त्वाची वक्तव्य काय आहेत? आपण जाणून घेऊयात.

Live Updates
17:36 (IST) 14 Feb 2026

Girls Safety : ''मुलींना सुरक्षा, सन्मान आणि त्यांचा आवाज द्या!'', 'महिलांची छेडछाड आणि पाठलाग' कार्यशाळेत विजया रहाटकर यांचे आवाहन…

Vijaya Rahatkar : मुलींना समाजात सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी केवळ पोलीसच नाही तर समाज आणि पालकांनीही संवाद वाढवून त्यांना आवाज दिला पाहिजे, असे आवाहन विजया रहाटकर यांनी केले आहे. ...सविस्तर बातमी
17:05 (IST) 14 Feb 2026

मुख्यमंत्री सपकाळांवर भडकले; 'टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपतींशी करणे निंदनीय'…

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसारख्या नराधमाशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत निषेध करत काँग्रेसला लाज वाटायला हवी अशा शब्दांत सुनावले आहे. ...सविस्तर बातमी
16:59 (IST) 14 Feb 2026

मुख्यमंत्री म्हणाले; 'मुलुंडमधील घटना दुर्देवी, राज्य सरकार चौकशी करणार...'

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींवर उपचार सुरू असून राज्य शासन मदत करणार असल्याचे सांगितले. ...अधिक वाचा
16:29 (IST) 14 Feb 2026

मेट्रो कामामुळे ठाणे, घोडबंदर, भिवंडीचा प्रवास धोक्याचा... मुलूंडच्या अपघातानंतर चालकांसह प्रवाशांचा सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर…

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एमएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून लोखंडी सळ्या आणि काँक्रीटचे तुकडे अंगावर पडण्याच्या भीतीने वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 14 Feb 2026
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कर्जमाफीचा निर्णय…”

Uday Samant On farmers Loan Waiver : गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह आदी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं शेतकरी आंदोलन केलं होतं. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जून २०२६ मध्ये करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं होतं.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 14 Feb 2026

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबरोबर हाणामारी? संजय राऊतांनी शेअर केला VIDEO; म्हणाले, “तुम्ही…”

Sanjay Raut Shared Rahul Narvekar’s VIDEO : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असून त्यांच्यामागे अनेक स्थानिक गावकरी दिसत आहेत. या स्थानिकांबरोबर त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसतंय. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओबाबत जाब विचारला आहे.

सविस्तर वाचा

14:38 (IST) 14 Feb 2026

Shashikant Shinde on NCP Merger : “विलीनीकरणावर आमच्याकडून आता No Comments”, शशिकांत शिंदे यांनी जाहीर केली भूमिका

Shashikant Shinde on NCP Merger : अजित पवार यांच्या अकस्मित निधनामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची प्रक्रियाही त्यामुळे रखडली. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चा काय होती याबाबत माहिती नाही, असं अजित पवारांचे नेते म्हणत आहेत. तर, ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचून पक्षाचं एकत्रीकरण १२ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होतं, असं शरद पवारांचे नेते म्हणत आहेत. दरम्यान, या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मोठी भूमिका जाहीर केली आहे. या चर्चेत आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

सविस्तर वाचा

14:33 (IST) 14 Feb 2026
Amol Mitkari : मंत्री नरहरी झिरवाळांसाठी अमोल मिटकरी मैदानात; पाठराखण करत दिला ‘हा’ इशारा; “ज्यांनी हे षडयंत्र रचलं असेल…”

Amol Mitkari On Narhari Zirwal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आलं.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 14 Feb 2026

Sharad Pawar :राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांनी मांडली ‘ही’ भूमिका; संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “त्यांनी मला…”

Sanjay Raut On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यातच सात राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहेत, यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेत जावं अशी मागणी करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा