Maharashtra Politics Updates : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनेक नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. या चर्चांच्या अनुषंगाने आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील मोठं भाष्य केलं. अजित पवारांचं स्वप्न काय होतं? याबाबत बोलताना दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हेच अजित पवारांचं स्वप्न होतं, असं वक्तव्य सयाजी शिंदे यांनी केलं. तर दुसरीकडे मुंबई महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण रितू तावडे यांनी महापौरांच्या खुर्चीवर बसण्याआधीच भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज आपण दिवसभरातील पाच महत्त्वाची वक्तव्य काय आहेत? जाणून घेऊयात.
Mohan Bhagwat: संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’, भाजपसह संघप्रणित संघटनांच्या पापात थोडा वाटा आमचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे परखड प्रतिपादन
भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगले दिवस (अच्छे दिन) नसून संघामुळे भाजपला ‘ अच्छे दिन ’ असल्याचे परखड प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. भाजपसह संघप्रणित संघटनांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचेच आहे, मात्र या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते असल्याने त्यांंच्या पापाचा थोडा वाटा आमच्याकडे येतो व आम्ही तो स्वीकारतो, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
‘उद्धव ठाकरे भाजपाबरोबर तर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जातील’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
Laxman Hake On Devendra Fadnavis and Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनेक नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही! ठोकून काढू…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही-गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काहीजण उद्योजकांना त्रास देण्याचे ‘उद्योग’ करत आहेत, अशी माहिती आपणाला मिळाली आहे. उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढू, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लगेच त्यांनी ठोकून काढू म्हणजे कायद्याने ठोकून काढू अशीही पुस्ती जोडली.
“परीक्षा पाकिस्तानात नाही” टीईटी परीक्षार्थी महिलांचे मंगळसूत्र काढायला लावल्यावरून अंबादास दानवेंचा संताप; फडणवीसांनी दिलं उत्तर!
TET Exam Mangalsutra Sambhaji Nagar : आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. यानिमित्ताने राज्यभरातील हजारो उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिला उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रातील नियम म्हणून त्यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगितले. यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी याविरोधात आवाज उठवला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay raut : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी थेट मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.
Sanjay Raut : महापौरांच्या खुर्चीवर बसण्याआधीच संजय राऊतांची रितू तावडेंवर टीका; म्हणाले, “फक्त त्यांनी एक करावं…”
Sanjay Raut on Ritu Tawade : मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाने रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मुंबईतून बांगलादेशींना हाकलून लावण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिलंय. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली.
“अजितदादांचं पहिलं स्वप्नं…”, अभिनेते सयाजी शिंदेंचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचं विधान
Sayaji Shinde on NCP Merger: अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती येथे श्रद्धांजली वाहिली. यानंतर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र घडविण्यात पवार कुटुंबाचा मोठा वाटा आहे. शरद पवार यांचे विचार पुढे नेण्याचे काम अजित पवार नेटाने करत होते. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची आपल्यावर आणि विशेषतः सुनेत्राताई पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी आहे. ते काम आपण करायला हवे, असे सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.

