राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. हा विमान अपघात सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चोकशी केली जात आहे. यारम्यान, डीजीसीएच्या अजित पवार यांच्या ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अपघात झाला त्या व्हीएसआर व्हेंचर्सची काही विमाने ग्राउंड केली आहेत या कारवाईनंतर आता रोहित पवारांनी आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन व्हिएसआर कंपनीचे मालक, डीजीसीएचे अधिकारी, अजित पवारांना हे विमान देणारे अधिकारी आणि घातपाताचा संशय असल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज पठण करण्यात आळ्याचा प्रकार समोर आला आहे. आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊयात.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादा गेल्यानंतर…”
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांच्या नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार? की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच मुद्द्यावर आज सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली. वाचा सविस्तर...
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात डीजीसीएने व्हीसीआर या कंपनीविरोधात कारवाई करत त्यांचे चार विमाने ग्राऊंड केली आहेक. यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याकरिता आज रोहित पवार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी त्यांचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. यानंतर रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली. वाचा सविस्तर
मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज पठण, भाजपा नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मालेगाव येथे लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह काही मुस्लिम नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
‘आरएसएस’च्या भैय्याजी जोशींचे पुन्हा वादग्रस्त विधान म्हणाले, मोदी सरकारच्या काळात पद्मश्री पुरस्काराचा सन्मान वाढला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी पद्मश्री पुरस्कारावरून वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जोशी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
‘डीजीसिऐ’ला आता चुका दिसल्या का? ‘त्या’ चुकांमुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात चौकशी केली जात आहे. याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले. मिटकरी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
