Coronavirus: राज्यात दिवसभरात २,५५६ रूग्णांची करोनावर मात

रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ

राज्यातील करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रूग्ण होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आजच्या दिवसभरातील राज्यातील करोनास्थितीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यानुसार, आज एकूण २ हजार १७१ नवे करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. काल दिवसभरात हा आकडा २ हजार २०४ इतका होता, पण आज मात्र रूग्णवाढीच्या वेगावर काही अंशी नियंत्रण मिळवता आलेले आहे. राज्यात ४३ हजार ३९३ सक्रिय रूग्ण आहेत. आज नवीन २ हजार ५५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १९ लाख २० हजार ००६ इतकी झाली आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२६ टक्के इतके झाले आहे.

पुण्यात एका दिवसात १२८ नवे रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात १२८ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख ८५ हजार १३३ इतकी झाली आहे. याच दरम्यान आज २ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ४ हजार ७४४ झाली आहे. १६८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १ लाख ७८ हजार ४४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra pune pimpri chinchwad coronavirus updates dated 27 january 2021 medical bulletin svk 88 kjp vjb