Mumbai, Maharashtra Rains News Live Updates, July 14, 2022 : दोन दिवसांसाठी मुंबई, संपूर्ण कोकणासह राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारीही मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते.मुंबईमध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस पडला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत २२०० ते २५०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत महिन्याभरातच ११०० मिमी पाऊस पडला आहे.

तर राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येत असून यानिमित्ताने पाठिंबा देणाऱ्या पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. असं असतांना द्रौपदी मुर्मू आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : राज्यातील विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…

19:28 (IST) 14 Jul 2022
मिरा भाईंदर महापालिकेतील ८ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात

भाईंदर- मिरा भाईंदर महापालिकेच्या शिवसेनेच्या ८ नगरसेवकांनी गुरूवारी एकनाथ शिंदे याना पाठिंबा जाहीर केला. गुरूवारी या ८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.

सविस्तर वाचा

19:27 (IST) 14 Jul 2022
पुणे : आणीबाणीत कारावास सोसलेल्यांना पुन्हा निवृत्तीवेतन ; जिल्ह्यातील ५३३ जणांना लाभ

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५३३ जणांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

सविस्तर वाचा

19:02 (IST) 14 Jul 2022
पुणे : अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास मुदतवाढ ; २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्याबाबत आयोगाचे आदेश

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादींवर मोठ्या प्रमाणावर हरकती-सूचना देण्यात आल्या असून त्याचा निपटारा करण्यास पुरेसा अवधी मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून २१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

18:35 (IST) 14 Jul 2022
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पांडे तसेच त्यांच्या कंपनीविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

18:28 (IST) 14 Jul 2022
शेतकऱ्याने हौशीसाठी चारचाकीच्या किंमतीत खरेदी केला खिलार खोंड

मध्यमवर्गीय कुटुंबाचे साजेशा घराबरोबर चारचाकी स्वमालकीची असावी असे स्वप्न असतेच. पण काळ्या आईवर जीवापाड प्रेम असलेल्या शेतकऱ्याचे दावणीला चार जनावरे असावीत ही इच्छा असतेच. त्यात दावणीला माणदेशी खिलार खोंड म्हणजे सोने पे सुहागा.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 14 Jul 2022
“आज राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर २-३ रुपयांनी कमी केले, थोड्या दिवसात केंद्र सरकार…”; इंधन दरकपातीवर NCP ची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इंधन दरकपात करण्याचे संकेत दिल्यानंतर आज इंधन दरकपातीची घोषणा करण्यात आली. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या घोषणेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. आज राज्याचे दर कमी केले असले तरी केंद्र सरकार दरवाढ करेल तेव्हा आजच्या दरकपातीचा काही उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल असं पाटील म्हणाले आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547555264802746368

17:35 (IST) 14 Jul 2022
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासक कालावधीत वाढ

पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकपदी म्हणून आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर आणखी दोन महिने प्रशासक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा

17:29 (IST) 14 Jul 2022
विदर्भ-मराठवाडा सीमेवरील ‘सहस्त्रकुंड’ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

विदर्भ-मराठवाडा सीमेवर नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी जुलै महिन्यातच ओसंडून वाहत आहे. विदर्भ, मराठवाड्याचा ‘नायगरा धबधबा’ अशी ओळख असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य नजरेत साठवून घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत. वाचा सविस्तर...

17:21 (IST) 14 Jul 2022
पिंपरी पालिकेतील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा

पिंपरी महापालिकेत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

17:20 (IST) 14 Jul 2022
पुणे : धोकादायक इमारती व घरांचा शोध घेण्याचे १३०० ग्रामपंचायतींना आदेश

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या दुर्घटना घडत असल्याने जिल्हा परिषदेने तात्काळ धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याचे आदेश १३०० हून अधिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

17:19 (IST) 14 Jul 2022
९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक स्थगित

९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्दय़ांवर लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विनंती, तसेच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगित करण्याची घोषणा आयोगाने केली आहे.

सविस्तर बातमी

17:12 (IST) 14 Jul 2022
ठाणे : पहिल्या पंधरवड्यात सहा तालुक्यात ८०० मिमी पेक्षा अधिक पाऊस

यंदाच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ३३.३ टक्के इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली होती. यामुळे राज्यात जून महिन्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहचला होता. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात जिल्ह्यात तब्बल ८५०.४ मिमी इतक्या पाऊस झाला असून सरासरीच्या १९९.८ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:54 (IST) 14 Jul 2022
पुणे : सराईत चोरट्याकडून नऊ दुचाकी जप्त

वाहन क्रमांकाचा फलक न वापरणाऱ्या दुचाकीस्वाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले. या अट्टल वाहनचोराकडून  साडेचार लाख रुपये किंमतीच्या नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

सविस्तर वाचा

16:53 (IST) 14 Jul 2022
अमरावती : अवघ्या दहा सेकंदात इमारत कोसळली

अमरावती शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या गांधी चौक ते अंबादेवी मार्गावरील एक इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे, ही इमारत जीर्ण झालेली नव्हती किंवा तिचे बांधकामही फार जुने नव्हते.

सविस्तर वाचा

16:51 (IST) 14 Jul 2022
बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक आवश्यक त्या परवानग्या घेऊनच – मुंबई महानगरपालिका, हेरिटेज समितीचा उच्च न्यायालयात दावा

महापौर बंगल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात रूपांतर करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्याचा आणि आवश्यक ती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने आज (गुरूवार) उच्च न्यायालयात केला. वाचा सविस्तर बातमी...

16:43 (IST) 14 Jul 2022
"दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी..."; पवारांनी शिवसेना फोडल्याच्या टीकेवरुन टोला

दीपक केसरकर हे खरे शिवसैनिक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना फोडण्यासाठी पवारच जबाबदार असल्याचा आरोप केसरकरांनी केल्याचं सांगत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना पाटील यांनी केसरकरच पवार यांना सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरवायचे असं सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547538527394893824

16:36 (IST) 14 Jul 2022
“शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ”

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पाहत आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत, तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

16:09 (IST) 14 Jul 2022
नागपूर : किचकट प्रक्रिया, जाचक अटी-शर्तींमुळे पदवीधरांची मतदार नोंदणी अवघड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू असून त्यासाठी वारंवार दिली जात असलेली मुदतवाढ आणि विद्यापीठाने घातलेल्या नियम व अटींमुळे पदवीधरांना नोंदणी करणे अवघड झाले आहे.

सविस्तर वाचा

15:58 (IST) 14 Jul 2022
मुंबई : बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडाचे सप्टेंबरनंतर हस्तांतरण ?

शिंदे सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुलेट ट्रेन टर्मिनससाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंड लवकरात लवकर ‘द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’ला (एनएचएसआरसीएल) देण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 14 Jul 2022
मुंबई : ऑगस्टपासून सर्व मेल, एक्स्प्रेसमध्ये चादर मिळणार

करोनाचा संसर्ग कमी होताच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वातानुकूलित श्रेणीतील प्रवाशांना चादर, उशी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने मार्च २०२२ मध्ये घेतला होता. त्यानंतरही मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या ९३ पैकी ४७ गाड्यांमध्ये ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध होऊ शकली नाही.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 14 Jul 2022
‘सरोगसी’प्रकरण : दाम्पत्याला केंद्रीय नियामक प्राधिकरणाकडे हजर होण्याचे आदेश

कृत्रिम मातृत्त्व (सरोगसी) कायद्यातील सुधारणेमुळे ‘सरोगसी’ची प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या दाम्पत्याला नव्या कायद्याअंतर्गत ‘सरोगसी’ प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय नियामक प्राधिकरणासमोर १ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

सविस्तर वाचा

15:49 (IST) 14 Jul 2022
मुंबई : प्रवाशांना झटपट तिकीट मिळणार ; पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकात आणखी २६३ एटीव्हीएम

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना झटपट तिकीट देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवरील स्थानकात आणखी २६३ नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

15:19 (IST) 14 Jul 2022
ठाणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळले; पंपाच्या मुखाशी अडकलेला कचरा पालिकेने काढला

भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाणी उपसा करणाऱ्या पंपा मुखाशी गाळ आणि कचरा अडकल्याने पुरेशा पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरात कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणी संकट ओढावले होते. मात्र, पाणबुड्यांच्या मदतीने या पंपाच्या मुखाशी अडकलेला कचरा आणि गाळ काढण्यात पालिकेला आज (गुरुवार) दुपारी यश आले आहे. यामुळे पंपाद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सुरु झाले असले तरी संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार सकाळपर्यंत सुरळीत होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. यामुळे ठाणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:04 (IST) 14 Jul 2022
अतिवृष्टीमुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २० जुलैला होणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही परीक्षा आता ३१ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, २० जुलैच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच ३१ जुलैच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. वाचा सविस्तर बातमी...

14:50 (IST) 14 Jul 2022
भातसा नदीच्या पुराचा कल्याण तालुक्यातील गावांना फटका

मुसळधार पावसामुळे भातसा नदीला पूर आल्याने कल्याण तालुक्यातील वालकस, बेहरे, खडवली-पडघा मार्ग, कुंभारखाण पाडा भागांमधील रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील रहिवाशांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:31 (IST) 14 Jul 2022
भंडारा : वैनगंगा नदीच्या प्रवाहामुळे मंदिरात अडकलेल्या १५ भाविकांची अखेर सुखरुप सुटका!

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माडगी येथील भगवान नरसिंग मंदिरांमध्ये अडकलेल्या १५ भाविकांना आज (गुरुवार) सकाळी ६ वाजता अखेर सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. यामध्ये ७ महिला व ८ पुरुष आहेत. सर्व भाविक आंधळगाव, मोहाडी, तुमसर, मुंढरी या गावातील आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने सर्वांना वरच्या माळ्यावर राहण्यास सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकाला पाचारण करण्यात आलेले होते. वाचा सविस्तर बातमी...

14:16 (IST) 14 Jul 2022
कल्याण, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा सुरळीत

उल्हास, काळू नदीच्या पुराचे पाणी पालिका जलशुध्दीकरण केंद्रात बुधवारी रात्री शिरल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी ही दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने रात्री बंद केली. त्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम आणि टिटवाळा शहरातील काही भागांचा पाणी गुरुवारी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पुराचे पाणी गुरुवारी पहाटेपर्यंत ओसरल्याने दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रे सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी...

13:51 (IST) 14 Jul 2022
कल्याणमधील सिटी पार्कला पुराच्या पाण्याचा तडाखा

कल्याण पश्चिमेतील वालधुनी नदीच्या काठी योगीधाम भागात ११२ कोटी खर्चू उभारण्यात येत असलेल्या सिटी पार्कला दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा फटका बसला. स्मार्ट सिटी प्रकल्प निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पुराचे पाणी पार्कमध्ये घुसल्याने आतील बांधकाम सामानाची नासधूस झाली आहे. वाचा सविस्त बातमी...

13:50 (IST) 14 Jul 2022
बदलापूर : आठवडाभरात बारवी धरणात ६३ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर

गेल्या आठ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणक्षेत्रात ६०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात धरणात ६३ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. आठवडाभरापूर्वी असलेला ३७ टक्क्यांचा पाणीसाठा गुरूवारी ५५ टक्क्यांवर पोहोचला होता. आतापर्यंत बारवी धरणक्षेत्रात ९९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील सुमारे ६०० मिलीमीटर पाऊस या आठ दिवसात पडला आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:27 (IST) 14 Jul 2022
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

१) पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय

२) राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार.

३) केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

४) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

५) राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

६) अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

७) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

८) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

९) आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार

13:25 (IST) 14 Jul 2022
शिंदे सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरकपात

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये कर कपात केली असून यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झालं आहे.

13:24 (IST) 14 Jul 2022
वसई दरड दुर्घटना : बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वसईच्या वाघरळ पाडा येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तीन चाळ बिल्डरांविरोधात एमआरटीपीएअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दुर्घटनेनंतर बिल्डर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:08 (IST) 14 Jul 2022
ठाण्यात मागील २४ तासात ३२ वृक्ष उन्मळून पडले

ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र थांबता थांबत नसून गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल ३२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. १३ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत तर ९ झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:39 (IST) 14 Jul 2022
चंद्रपूर : पुरात अडकलेले २२ वाहनचालक सुखरूप; ५९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक नागरी वस्त्यांत पाणी शिरले आहे. ५५१ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ २ दिवसांपासून २२ वाहनचालक आपल्या ट्रकमध्येच अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:25 (IST) 14 Jul 2022
पुणे : कात्रज भागात ज्येष्ठ महिलेचा गळा आवळून खून

कात्रज भागात मोलमजुरी करुन एकट्या राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकी आली. ज्येष्ठ महिलेकडील दागिने लांबवून चोरटा पसार झाला. वाचा सविस्तर बातमी...

12:15 (IST) 14 Jul 2022
मुंबई : तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या तुलनेत भरघोस वाढ

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण नऊ लाख ५२ हजार दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले असून पाणी तुटवड्याची चिंता मिटली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात जास्त म्हणजेच तिप्पट आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:14 (IST) 14 Jul 2022
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; ‘लोकल’चे वेळापत्रक विस्कळीतच

मुंबई शहर आणि उपनगरांत गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये शहर आणि उपनगरात मध्यम ते अति जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. तर, सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आज देखील (गुरुवार) मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते. वाचा सविस्तर बातमी...

11:40 (IST) 14 Jul 2022
'झाडी, डोंगार, हाटील'ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, "काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट..."

“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांना या डायलॉगमुळे घरी मात्र रोषाला सामोरं जावं लागलंय. शहाजीबापू यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547463324836982784

11:38 (IST) 14 Jul 2022
पुणे : पर्यटकांनो.. नियमांचे पालन करा…जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

पुणे जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. या ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट आदी ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 14 Jul 2022
भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी बंडखोरी करणारे शिवसेनेचे नेते आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भविष्यात नक्की एकत्र येतील असं मत व्यक्त केलं आहे. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रातील कनाकोपऱ्यात पोहचलेल्या शहाजीबापू यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना हे विधान केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547442718334660609

11:36 (IST) 14 Jul 2022
‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांवरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता असं म्हणणाऱ्या केसरकरांना आव्हाड यांनी, “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारलाय. आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547445086258360320

11:35 (IST) 14 Jul 2022
“…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केल्यानंतर निलेश राणे यांनी कठोर शब्दांमध्ये केसरकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन निलेश यांनी काही ट्वीट करत केसरकर यांना लक्ष्य केलं आहे. केसरकरांविरोधात संताप व्यक्त करणारी काही ट्वीट बुधवारी रात्री निलेश राणेंनी केली असून यामध्ये केसरकरांनी राणे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करताना आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगण्यात आलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1547447147171545089

11:31 (IST) 14 Jul 2022
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार असणारे यशवंत सिन्हा यांनी उद्धव ठाकरेंवर भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याने त्यांनी आपल्या जागी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असं यशवतं सिन्हा गुवाहाटीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. मी कोणत्या राजकीय पक्षाशी नाही, पण कदाचित केंद्र सरकारसोबत लढत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

11:30 (IST) 14 Jul 2022
अमित ठाकरेंना खरंच मंत्रिपद मिळणार आहे का? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांना मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सविस्तर बातमी

11:29 (IST) 14 Jul 2022
“कालपर्यंत राज्यपालांनी घटनेचं पालन केलं नाही, आता…”, नव्या सरकारवरून संजय राऊतांचा टोला!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारला आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 14 Jul 2022
काँग्रेसची शिवसेनेविरोधात शिंदे-फडणवीसांकडे तक्रार! ‘ही’ कृती ठरवली अनैतिक, तातडीने पावलं उचलण्याची मागणी!

काँग्रेसकडून शिंदे आणि फडणवीसांकडे शिवसेनेची तक्रार करण्यात आली असून शिवसेनेच्या अनैतिक कृतीवर तातडीने पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

Maharashtra Monsoon Updates Today

महाराष्ट्र-मुंबई पाऊस लाइव्ह अपडेट्स