महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ४६७ करोना रुग्णांना डिस्चार्ज

मागील २४ तासात ७५ मृत्यूंची नोंद

संग्रहीत

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ४६७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.१७ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ९९४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १९ लाख ९६ हजार ६२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८८ हजार ७६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३ हजार ८८६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ४ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ६० हजार ३५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील १८ लाख ८८ हजार ७६७ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ४८ तासांपैकी १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालवाधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे-९, यवतमाळ-२, अमरावती-१, औरंगाबाद-१, नागपूर-१, सातारा-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra reported 3994 new covid19 cases 75 deaths and 4467 discharges today scj

ताज्या बातम्या