देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अद्यापही वाढत आहे. आज राज्यात १७ हजार ६६ नवे करोनाबाधित आढळले असून, २५७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय, १५ हजार ७८९ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे.

राज्यातील १० लाख ७७ हजार ३७४ करोनाबाधितांच्या संख्येत २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्ण व आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या ७ लाख ५५ हजार ८५० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

आजपर्यंत राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० जण करोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ नमून्यांपैकी आजपर्यंत १० लाख ७७ हजार ३७४ नमूने (२०.२ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात १७ लाख १२ हजार १६० जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार १९८ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज २ हजार २५६ नवे करोनाबाधित आढळले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७१ हजार ९४९ वर पोहचली असून, यामध्ये ३१ हजार ६३ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले १ लाख ३२ हजार ३४९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८ हजार १७८ जणांच्या संख्येचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.