COVID 19 : राज्यात दिवसभरात २ हजार ६८० रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.३९ टक्के

राज्यात आज १ हजार ७१५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.

corona update
राज्यात आज रोजी एकूण ७,५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे. कारण, दररजो आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ७१५ नवीन करोनाबाधित आढळले असून, २ हजार ६८० रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, २९ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झालेला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.३९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९१,६९७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३९,७८९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७(१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २८,६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

करोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत दिवसभरात करोनामुळे एकही मृत्यू नाही!

करोना महामारी सुरू झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच दिवसभरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील २४ तासांत मुंबईमध्ये एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर, ३६७ नवीन करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. महागनराचा पॉझिटिव्हिटी रेट १.२७ टक्के झाला असून, यामध्ये ५ हजार ३० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्के आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra reports 1715 new covid19 cases 2680 recoveries in the last 24 hours msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या