महाराष्ट्रात दिवसभरात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४ टक्के

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

संग्रहीत

महाराष्ट्रात आज ६ हजार ५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ८९ हजार ९५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.२४ टक्के झाला आहे. आज राज्यात २ हजार ८३४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा आज घडीला २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २१ लाख ५७ हजार ९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ९९ हजार ३५२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ९३८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ९९ हजार ३५२ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ५५ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू गडचिरोली-७, पुणे-५, औरंगाबाद-१, कोल्हापूर-१, नागपूर-१ आणि नाशिक-१ असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पुण्यात एकाच दिवसात 163 रुग्ण आढळले, तर 4 जणांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात 163 करोना बाधित रुग्ण आढळले. आज 1 लाख 76 हजार 228 इतकी करोना रुग्णांची संख्या झाली आहे, तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून 4 हजार 581 मृतांची संख्या झाली आहे. त्याच दरम्यान 252 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 549 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये १०३ नवे करोना बाधित रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 103 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 98 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 95 हजार 436 वर पोहचली असून पैकी, 91 हजार 954 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 748 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra reports 2234 new covid 19 cases taking tally to 1899352 scj

ताज्या बातम्या