राज्यात २६६ रुग्णांचे नव्याने निदान ; मृतांची संख्या मात्र शून्य

दैनंदिन रुग्णसंख्येत भर पडत असल्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १५५१ झाली आहे. मुंबईत हे प्रमाण ९३२ वर गेले आहे.

मुंबई : राज्यात मंगळवारी पुन्हा करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या अडीचशेच्या पुढे गेली आहे. मंगळवारी राज्यात २६६ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर २४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या वाढलेली असली तरी मंगळवारी राज्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवारी नव्याने आढळलेल्या २६६ रुग्णांमध्ये १५८ रुग्ण हे मुंबईत नोंदले आहेत. मुंबईत मंगळवारी पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून सध्या २५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असल्याने करोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी मुंबईत १२२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन रुग्णसंख्येत भर पडत असल्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १५५१ झाली आहे. मुंबईत हे प्रमाण ९३२ वर गेले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra reports 266 covid 19 cases no death zws

Next Story
सेनेकडून दुसरा उमेदवार रिंगणात ; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस; अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांना महत्त्व
फोटो गॅलरी