राज्यात आता दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत लागली आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतील भर सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४८ हजार २११ रूग्ण करोनातून बरे झाले तर, २६ हजार २११ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ५१६ रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

आजपर्यंत राज्यात ४८,७४,५८२ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९०.१९ टक्के झाले आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यात ८२ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यू दर आता १.५३ टक्के आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ नमुने (१७.२५) टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर, २८ हजार १०२ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात ४,४५,४९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.