राज्यातील करोना संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला तरी, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्यते वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार २८२ जणांना करोनावर मात केली. तर, आतापर्यंत १८ लाख ७१ हजार २७० जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.७ टक्के आहे. याशिवाय, आज दिवसभरात २ हजार ९३६ नवे करोनाबाधित आढळले असून, ५० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ७४ हजार ४८८ वर पोहचली आहे. सध्या राज्यात ५१ हजार ८९२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, ५० हजार १५१ रुग्णांचा आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १,३५,००, ७३४ नमून्यांपैकी १९ लाख ७४ हजार ४८८ (१४.६३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख २७ हजार ८७६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात करोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

Coronavirus – राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण; ५११ ठिकाणी असणार केंद्र

राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार असून, याची जय्यत तयारी सुरु आहे. आज(मंगळवार) सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.