दिलासादायक : राज्यात दिवसभरात ८२ हजार २६६ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के

५३ हजार ६०५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू

संग्रहीत छायाचित्र

राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,२८,२१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra reports 53605 new covid19 cases 82266 recoveriesin the last 24 hours msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे