Maharashtra News Updates: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळाकडून सकाळी ११.३० वाजता निकाल जाहीर करण्यात आला. राज्यभरातून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांतर्फे यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. याशिवाय राज्यातील राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा – संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates, 8 May 2026: राज्यातील आजच्या ताज्या घडामोडी.

21:15 (IST) 8 May 2026

महानगरपालिका, नगरपालिका मधील दीर्घकालीन कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी पालकमंत्र्यांची शिफारस; मंत्रालय स्तरावर होणार...

वसई-विरार महापालिकेतील ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मकता दर्शवली असून मंत्रालय स्तरावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. ...सविस्तर वाचा
21:07 (IST) 8 May 2026

Mumbai Local Train MegaBlock : मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री विशेष देखभालीच्या कामासाठी ब्लॉक नियोजित केला आहे. ...वाचा सविस्तर
20:53 (IST) 8 May 2026

कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांवर पणन विभागाची करडी नजर; बाजार समित्यांना भेसळ रोखण्याच्या सूचना

वाशी एपीएमसीमध्ये रसायनांद्वारे आंबे पिकवण्याचे प्रकार समोर आल्यानंतर पणन विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ...सविस्तर बातमी
20:45 (IST) 8 May 2026

IAS Avinash Pathak Police Custody : अविनाश पाठक यांना सात दिवसांची कोठडी...

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील २४१ कोटींच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तपासाला वेग आला आहे. ...वाचा सविस्तर
20:37 (IST) 8 May 2026

11th Admission 2026 : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केली नाेंदणी

FYJC Online Admission 2026 : दहावीचा निकाल लागताच अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून ११ मेपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरून आपली पसंतीची महाविद्यालये निवडता येणार आहेत. ...अधिक वाचा
20:03 (IST) 8 May 2026

​नाशिक टीसीएस प्रकरण! निदा खानला ११ मेपर्यंत कोठडी; 'बुरखा' आणि 'धार्मिक ॲप्स'वरून न्यायालयात काय घडलं?

नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस प्रकरणात ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तिचे 'मलेशिया कनेक्शन' आता समोर आले आहे. ...सविस्तर बातमी
19:58 (IST) 8 May 2026

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण; अमित शहा यांच्या दोषमुक्तीला दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले, याचिका राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून…

राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून दाखल झालेली ही याचिका असल्याचे नमूद करत मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शहा यांच्या दोषमुक्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ...सविस्तर वाचा
19:50 (IST) 8 May 2026

मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांनी फेटाळलेले प्रस्ताव अखेर मंजूर; प्रतिष्ठेचा दादर-नायगाव भूखंड पुनर्विकास प्रस्ताव मंजूर...

मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीने गेल्या आठवड्यातील पराभवाचा वचपा काढत दादर-नायगाव भूखंड पुनर्विकासाचा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रस्ताव विशेष महासभेत ११२ विरुद्ध ८९ मतांनी मंजूर करून घेतला आहे. ...सविस्तर वाचा
19:45 (IST) 8 May 2026

निकालाचा टक्का घसरला! नाशिक विभाग ९५ टक्क्यांवरून ९० वर; कुठे चुकले गणित?

नाशिक विभागाचा दहावीचा निकाल यंदा ९०.५३ टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालात २.५१ टक्क्यांची मोठी घसरण झाल्याने शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी
19:30 (IST) 8 May 2026

पन्हाळा सादोबा दर्गा अतिक्रमण पाडकाम लांबणीवर; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पन्हाळा परिसरात १० मे पर्यंत कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश; नागरिकांना एकत्र येण्यास मनाई. ...अधिक वाचा
19:26 (IST) 8 May 2026

Sports Quota Recruitment MAT Order : भरतीतील खेळाडूंसाठी दिलासादायक बातमी! मॅटचा नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण आदेश…

सार्वजनिक बांधकाम विभागातील ५ टक्के क्रीडा आरक्षणाबाबत मॅटचा महत्त्वपूर्ण निकाल. ...वाचा सविस्तर
19:09 (IST) 8 May 2026

MSRTC : एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक...

एसटी महामंडळाने सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत प्रवासासाठी जुलै २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे आता बंधनकारक केले आहे. ...अधिक वाचा
18:53 (IST) 8 May 2026

महिला बालकल्याण आणि आरोग्य समिती निवडणूकीत बविआचे वर्चस्व...

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य आणि महिला बालकल्याण समिती निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भाजपचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून सर्व पदे खिशात घातली आहेत. ...सविस्तर बातमी
18:44 (IST) 8 May 2026

मोठी बातमी ! अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे दर्शनासाठी बंद, कधीपर्यंत राहणार बंद?

पुरातत्त्व विभागामार्फत अष्टविनायकातील सर्व मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मागील दोन महिन्यांपासून श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव, श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथे जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ...सविस्तर बातमी
18:43 (IST) 8 May 2026

मानहानीचे प्रकरण : संजय राऊतांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय रद्द करा; मागणीसाठी मेधा सोमय्या उच्च न्यायालयात...

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने राऊतांना नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. ...अधिक वाचा
18:37 (IST) 8 May 2026

मुंबई विभागाच्या निकालातही घसरण; यंदा ९४.९७ टक्के निकाल; मुंबई विभागातील १६ हजार २५९ विद्यार्थी अनुतीर्ण

दहावीच्या निकालात यंदा मुंबई विभागाच्या कामगिरीत ०.८७ टक्क्यांनी घट झाली असून एकूण निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. विभागातील १६ हजार २५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, यंदाही मुलींनी ९६.४० टक्के निकालासह मुलांच्या तुलनेत बाजी मारली आहे. ...वाचा सविस्तर
18:21 (IST) 8 May 2026

मद्य परवाना मिळवून देण्यासाठी ४० लाखांचा गंडा

सांगली जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाने मद्य परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ४० लाख ५४ हजार रुपयांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 8 May 2026

डोंबिवली बावनचाळीतील रेल्वे मैदानात ३५ ट्रक बेकायदा माती टाकल्याने गुन्हा दाखल

बेकायदा माती आणून टाकणाऱ्या अज्ञात इसमा विरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय जमीन महसूल कायदा आणि रेल्वे कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. सव्वा पाच लाख रूपये किंमतीची ही ३५ ट्रक माती आहे. ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 8 May 2026

घोडबंदरमध्ये विजेच्या लंपडावामुळे पाणी टंचाई, रस्ते कामामुळे होतोय सातत्याने वीज पुरवठा खंडीत

घोडबंदर रोडवर एमएमआरडीए तर्फे सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे विद्युत वाहिन्यांचे नुकसान होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:45 (IST) 8 May 2026

"निदा खानला MIM ने वस्तीत लपवलं होतं"; शिरसाटांचा आरोप, जलील यांच्या चौकशीची केली मागणी

"इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. हे एक मोठं षडयंत्र आहे. निदा खानला त्यांनी उघड पाठिंबा का दिला? तिच्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. निदा खान इतर कुठेही न जाता केवळ संभाजीनगरलाच का जाते?", असा संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

16:21 (IST) 8 May 2026

कोकण मंडळाचा राज्यात पुन्हा अव्वल मान; दहावीचा निकाल ९७.६२ टक्के

कोकण विभागाने दहावीच्या निकालात बाजी मारली असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल पहा. ...अधिक वाचा
16:12 (IST) 8 May 2026

SSC Result Live: गडचिरोली जिल्ह्यातील ८२.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावीच्या निकालात गडचिरोली जिल्ह्यातील ८२.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. येथे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी अधिक आहे.

16:09 (IST) 8 May 2026

रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.७७ टक्के

Raigad SSC Result 2026: रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.७७ टक्के लागला आहे. यंदा मुलांनी मुलींपेक्षा जास्त यश मिळवले असून पोलादपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. ...सविस्तर वाचा
15:29 (IST) 8 May 2026

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी मारली बाजी, पण नागपूर विभागात जिल्हा सर्वात शेवटी

Gadchiroli SSC Result 2026 : शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी अधिक आहे. ...सविस्तर बातमी
15:04 (IST) 8 May 2026

बारावी पाठोपाठ दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत कोल्हापूर विभागाची घसरण

आज लागलेल्या निकालात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात, कोल्हापूर जिल्हा ९६.६७ टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांकावर राहिला. ...अधिक वाचा
14:57 (IST) 8 May 2026

SSC Result 2026 Live Updates: पुण्यातील विद्यार्थ्यांचा निकालानंतर जल्लोष

14:55 (IST) 8 May 2026

SSC Result Live: निकालानंतर जल्लोष

14:54 (IST) 8 May 2026

ठाणे जिल्ह्यात दहावीचा ९५.०४ टक्के निकाल, यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक

ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी १ लाख ११ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ०५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...अधिक वाचा
14:20 (IST) 8 May 2026

SSC Result 2026: राजभाषेची ही अवस्था का? मातृभाषेतच विद्यार्थ्यांची दांडी गुल! मराठी भाषेत ८० हजारांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

Maharashtra SSC Result 2026: एकूण ३५ विषयांपैकी १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्याही वाढताना दिसत आहे. ...अधिक वाचा
14:11 (IST) 8 May 2026

SSC Result Live: मुंबई विभाग तिसऱ्या स्थानी, पुणे विभागाचा नंबर कितवा?

राज्यात दहावीच्या निकालात मुंबई विभागाची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९७ टक्के एवढी असून, हा विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. तर ९४.२४ टक्क्यांसह पुणे विभाग चौथ्या स्थानावर आहे. कोल्हापूर विभागाने ९५.४७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. तर ९७.६२ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल स्थानी आहे.

Sharad Pawar | Supriya Sule

रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक (X/ Sharad Pawar)