राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर करोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आज राज्यात ८ हजार ३९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार १० करोना बाधित रुग्णांनी करोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८६ % एवढे झाले आहे. दुसरीकडे आज राज्यात ६ हजार ३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २०८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३ लाख २६ हजार ८१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ७५ हजार ३९० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १२.६७ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ३ लाख ९८ हजार ३९७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ५०७ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्येआहेत. राज्यात ६२ हजार ३५१ रुग्ण सक्रिय आहेत.

दुसरीकडे देशात सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४१,१९५ नवीन करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर ४९० करोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याआधी ५ ऑगस्ट रोजी ४४,६४३ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३९,०६९ लोकांनी करोनावर मात केली आहे. तर ४९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या ४४,१९,६२७ लस दिल्या गेल्या आहेत. त्यानंतर लसीकरणाची एकूण संख्या ५२,३६,७१,०१९ झाली आहे.

पालकांना मोठा दिलासा, शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात; सरकारी आदेश जारी!

देशात आतापर्यंत ५२ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. भारताला १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी ८५ दिवसांचा अवधी लागला होता. त्यानंतर ४५ दिवसात २० कोटींचं लक्ष्य गाठलं. तर ३० कोटींचं लक्ष्य गाठण्यासाठी २९ दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर २४ दिवसात ४० कोटींचं लक्ष्य गाठलं. आता मागच्या २० दिवसात ५० कोटींचं लक्ष्य गाठण्यात यश आलं आहे.