इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी पोस्टरला काळे फासले आहे.

पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.