Maharashtra Top 5 Political Stories : अजित पवारांचा विमान अपघात ही दुर्घटना होती की घातपात ? यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याबरोबरच दुसरीकडे पुण्यातील महार वतन जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना अभय दिल्याचा प्रकार समोर आला असून याबाब राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Live Updates
16:47 (IST) 17 Feb 2026

Devendra Fadnavis : "अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला…"; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्या दिवसापासून पुढच्या तीन दिवसांत ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. यावरुन बरीच टीका होते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे ...अधिक वाचा
13:23 (IST) 17 Feb 2026

“आत्या मी…”, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं होतं?

पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. तर दोन सरकारी अधिकार्‍यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. याप्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे... सविस्तर वाचा...

13:23 (IST) 17 Feb 2026

Narhari Zirwal : “आता विखुरलेलं राहून चालणार नाही”, म्हणणाऱ्या नरहरी झिरवळांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवारांच्या निधनानंतर आता विखुरलेलं राहून चालणार नाही, अशी विलीनीकरणाबाबत सर्वांत आधी चर्चा सुरू करणारे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आता विलीनीकरणावर अत्यंत संयत भूमिका घेतली आहे.... झिरवळ नेमकं काय म्हणाले?...

13:22 (IST) 17 Feb 2026

पार्थ पवार यांना अभय; पुणे येथील जमीन घोटाळ्याचा अहवाल सादर; दोन अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाईची शिफारस

पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन खरेदी प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आलाआहे. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणार्‍या दोन सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे... वाचा सविस्तर

13:21 (IST) 17 Feb 2026

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ५ ते ६ जण भाजपाचे…-बच्चू कडू यांचा दावा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा जण भाजपाचे लोक आहेत. भाजपामध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी राष्ट्रवादीतच राहून या पक्षाला पोकळ करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.... वाचा सविस्तर बातमी...

13:20 (IST) 17 Feb 2026

अजित पवारांच्या विमानाचा घातपात झाला? चर्चेचा सूर अचानक का बदलला?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विविध चर्चा सुरू आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. पण, ब्लॅक बॉक्स बंद ठेवल्याचे, ब्लॅक बॉक्स जळून खराब झाल्यामुळे तो परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून विश्लेषण करून घेण्याच्या बातम्यांची चर्चा सुरू आहे. याबाबत रोहित पवारांनी शंका उपस्थित केल्या आहेत... वाचा सविस्तर बातमी....