Maharashtra Top 5 Political Stories: अजित पवारांचा विमान अपघात हा घातपात होता की दुर्घटना? यावर आता पुन्हा एकदा खल सुरू झाला आहे. २८ जानेवारी रोजी विमान कोसळल्यानंतर त्याच दिवशी बारामती येथे शरद पवारांनी हा अपघात असल्याचे विधान केले होते. तरीही विविध नेत्यांबाबत शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. आता पवार कुटुंबातील सदस्य आणि अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीच यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद उफाळला आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलत असताना रोहित पवारांच्या आरोपांवर चौकशी करण्याची मागणी केली. तसेच अजित पवार हे २७ जानेवारी रोजीच बारामतीला गाडीने जाणार होते. मात्र विदर्भातील एका फाईलवर स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरल्यामुळे अजित पवारांना उशीर झाला.

यात प्रफुल पटेलांचे नाव काही लोक घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुई जाते. यामुळे याप्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी प्रफुल पटेल यांनी केली.

Live Updates
19:36 (IST) 12 Feb 2026

हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलमधून ६.४० लाख प्रवाशांनी केला गारेगार प्रवास, रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या १४ फेऱ्या रद्द करून त्या वेळेत १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात झाली. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत आहेत. ...सविस्तर वाचा
16:08 (IST) 12 Feb 2026

Supriya Sule : "रोहितची अस्वस्थता...", सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मांडली भूमिका; म्हणाल्या, "आमचं कुटुंब..."

Supriya Sule : अजित पवारांचा मृत्यू अपघात आहे की घातपात आहे याची चौकशी करावी, याकरता रोहित पवारांनी मागणी केली आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. ...सविस्तर वाचा
16:03 (IST) 12 Feb 2026

Manoj Jarange Patil: "माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत"; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 12 Feb 2026

Maharashtra development : स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन- मुख्यमंत्री फडणवीस

टाटा ट्रस्ट सोबत १२ व नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार... ...अधिक वाचा
15:58 (IST) 12 Feb 2026

"विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं तर…", रोहित पवारांनी कोणती शंका व्यक्त केली?

Rohit Pawar on Black Box: अजित पवारांच्या विमानाचे मुख्य पायलट कपूर यांच्यावर दबाव आणला गेला होता का? याची चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ...अधिक वाचा
15:57 (IST) 12 Feb 2026

Supriya Sule : लेकीचे लग्न जुळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न जमल्याची माहिती दिली आहे. ...सविस्तर बातमी