Maharashtra Top 5 Political Stories : परभणी महानगर पालिकेच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम समाजातील इकबाल सय्यद खाजा यांना संधी दिली. त्यामुळे राज्यभरातून शिवसेनेवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मंत्रालयात नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील एका कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसंच, अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून आजही त्यांनी या प्रकरणाची चौकशी सखोल व्हावी या मागणीला जोर दिलाय. तसंच,अजित पवारांच्या मुद्द्यावरून हसन मुश्रीफ यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या पाच विधाने आपण पाहुयात.
५ हजार पदांच्या प्राध्यापक भरतीत ३,५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची भीती, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून…
५ हजार पदांच्या प्राध्यापक भरतीत ३,५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची भीती, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून…
Hasan Mushrif : "तटकरे, पटेल व्हिलन कसे? त्यांना का टार्गेट करताय?" हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना थेट सवाल
"पक्षांतर्गत कार्यात लुडबूड करू नका", हसन मुश्रीफांची रोहित पवारांवर टीका
आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सखोल अभ्यास करून प्रेजेंन्टेशन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या शंका उपस्थित झाल्या आहेत, ज्याबद्दल अनेक आक्षेप घेतले आहेत त्याची सखोल चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांच्या चुलत्यांचा अपघात झाला आहे, त्यांना दुःख झालंय तसंच आम्हालाही झालं आहे. आमच्याही मनातील शंका मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केला आहे. पण आमच्या पक्षाती अंतर्गत गोष्टीत भाग घेऊ नये. आमच्या पक्षातील नेत्यांना विनाकारण टार्गेट करून आमच्या पक्षांतर्गत कार्यात लुडबुड करू नका - हसन मुश्रीफ
Rohit Pawar : “पायलटवर कोणाचा दबाव होता का?” अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय बळावला!
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Incident : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सातत्याने अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रश्न उपस्थित केले. मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची शंका पुराव्यानिशी उपस्थित केली. याकरता विविध स्तरांवर चर्चा करत असून याचा तपास लागण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, त्यांनी आज पुन्हा अमहदाबाद विमान दुर्घटनेचा धागा पकडत या प्रकरणाचा सखोल तपास झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली आहे.
Narhari Zirwal: ५० हजारांची लाच घेताना क्लर्कला अटक होताच मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्यापर्यंत धागेदोरे आल्यास…”
Narhari Zirwal Reaction in Bribery Case: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले. या सर्व घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला’, परभणी महापौरबाबत एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
Sanjay Raut on Parbhani Mayor Post: परभणी मनपाच्या महौपारपदी शिवसेनेच्या (ठाकरे) सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची निवड नुकतीच करण्यात आली. तर उपमहापौरपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली होती. शिवसेनेने (ठाकरे) मुस्लीम महापौर बसविल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. “२०१९ ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला”, अशी टीका शिंदे यांनी केली होती. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
