विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल यायला सुरूवात झाली असून राज्यातल्या सर्वाधिक 62 मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या विदर्भात भाजपाला नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने विदर्भात जबरदस्त मुसंडी मारली होती. परिणामी यंदाच्या निवडणुकीत विदर्भ कोणाची साथ देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये पाहुयात कोणाला आघाडी, कोणाला पिछाडी :-
- नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर काँग्रेसकडून आशिष देशमुख यांच्यात प्रमुख लढत होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले होते. मात्र, भाजपच्या अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा विजय झाला तर देशमुख यांचा पराभव झाला. पण, भाजपाला नागपूर आणि विदर्भात बसलेल्या फटक्यामुळे मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली रद्द
- यवतमाळमधून राज्यमंत्री मदन येरावार यांचा पराभव, भाजपाला धक्का
- बच्चू कडू चौथ्यांदा विजयी, अमरावतीच्या अचलपूरमधून मिळवला विजय
- भाजपाला नागपुरात पहिला धक्का, पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी
- बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी, वंचितचा उमेदवार विजयराजे शिंदे दुसऱ्या क्रमांकावर
- यवतमाळच्या राळेगावमधून भाजपाचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा पराभव.अशोक उईके यांचा विजय.
- नागपूरच्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून माजी मंत्री राजकुमार बडोलेंचा पराभव, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरेंचा विजय
- अमरावतीच्या तिवसा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांची विजयाची हॅटट्रिक.
- मेळघाटमधून प्रहार जनशक्तीचे उमेदवार राजकुमार पटेल विजयी
- राज्याचे कृषिमंत्री व भाजप उमेदवार अनिल बोंडे मोर्शीमधून पराभूत
- अपक्ष उमेदवार रवी राणा विजयी, अमरावतीच्या बडनेरा मतदार संघातून मिळवला विजय
- नागपूरच्या साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले 12 हजार मतांनी विजयी.
- नागपुरात भाजपला दोन जागांवर काँग्रेसचा धक्का. पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर देशमुख तर उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने यांचा पराभव.
- नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी, भाजपाच्या सुधाकर कोहळेंचा पराभव
- अमरावतीः अचलपूरमधून बच्चू कडू चौथ्यांदा विजयी
- काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार मतांनी आघाडीवर
- सावनेर: काँग्रेसचे सुनील केदार ३५०० हजार मतांनी आघाडीवर
- कामठी: काँग्रेसचे सुरेश भोयर २२०० मतांनी आघाडीवर
- हिंगणा: भाजपचे समीर मेघे १० हजार मतांनी आघाडीवर
- उमरेड: भाजपचे सुधीर पारवे ८०० मतांनी आघाडीवर
- नागपूर पूर्वः अकराव्या फेरीनंतर भाजपचे कृष्णा खोपडे यांना १५ हजार ९०२ मतांची आघाडी
- गोंदियाः दहाव्या फेरी अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल १७ हजार १०५ मतांनी आघाडीवर.
- भंडाराः काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले पिछाडीवर.
- नागपूर पूर्व: भाजपाचे खोपडे १५,९०२ हजार मतांनी आघाडीवर
- नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी, भाजपाच्या सुधाकर कोहळेंचा पराभव
- नागपूर दक्षिण: भाजपाचे मोहन मते ५४०० मतांनी आघाडीवर
- नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत आघाडीवर
- नागपूर मध्य: भाजपाचे विकास कुंभारेआघाडीवर
- विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे उमेदवार विजय वडेवट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून ५ हजार मतांनी पुढे.
- बल्लारपूर मतदारसंघात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ हजार मतांनी आघाडीवर
- अमरावतीः यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप, रमेश बुंदिले हे विद्यमान आमदार पछाडीवर. तर मेळघाटमध्ये प्रहारचे राजकुमार पटेल यांना २६ हजारांची आघाडी
- वर्ध्यातून काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर
- खामगावमधून भाजपा उमेदवार आकाश फुंडकर आघाडीवर
- मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमूलकर आघाडीवर
- गोंदियाः दहाव्या फेरी अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल १७ हजार १०५ मतांनी आघाडीवर
- नागपूर ग्रामीण काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार मतांनी आघाडीवर
- मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर
- वरोरातून शिवसेनेचे संजय देवताळे आघाडीवर
- अहेरीमधून भाजपचे राजे अम्ब्रिश आत्राम आघाडीवर
- यवतमाळः राळेगावमधून भाजपाचे अशोक उईके १५०० मतांनी आघाडीवर
- यवतमाळः वणीमधून काँग्रेसचे वामन कासावार २ हजार मतांनी आघाडीवर
- यवतमाळः आर्णीमधून काँग्रेसचे शिवाजी मोघे २०३४ मतांनी आघाडीवर
- यवतमाळः पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक ४४०० मतांनी आघाडीवर
- यवतमाळः उमरखेडमधून भाजपचे नामदेव ससाणे १२२० मतांनी आघाडीवर
- मूर्तिजापूरमधून वंचितच्या प्रतिभा अवचार ३८५३ मतांनी आघाडीवर, भाजपाचे हरीश पिंपळे तीन नंबरवर