Maharashtra Vidhan Sabha Election Updates: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व खोचक टोलेबाजीही पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांमुळे अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलंच तापलं आहे.
Maharashtra News Today, 14 November 2024: विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स!
“अमित शाह यांनी महाराष्ट्र अदानीला विकला”, कन्हैया कुमार गरजले, “कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक…”
पक्ष फाेडून साेयीच्या व्यक्तीच्या हाती महाराष्ट्राची सत्ता दिल्याचा घाणाघाती आराेप कन्हैया कुमार यांनी केला.
पंतप्रधानांच्याही बॅगा तपासायला हव्यात, तशी मागणी करण्याचा मला अधिकार - उद्धव ठाकरे
देशाचे पंतप्रधान जेव्हा प्रचारासाठी येतात तेव्हा त्यांच्या देखील बॅगा या तपासल्या गेल्या पाहिजेत आणि तसे मागणी करण्याचा अधिकार या देशाचा नागरिक म्हणून मला आहे असे उद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या गृह मतदानाला सुरुवात , मलबार हिलमधील पावणेतीनशे मतदारांचे मतदान
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून राज्यात ज्येष्ठ नागरिक आणि अपंग नागरिकांच्या गृह मतदानाला सुरुवात झाली. मुंबईमधील बोरिवली मतदारसंघातून या उपक्रमाला सुरुवात झाली. उपनगर आणि शहरातील बहुतांशी मतदारसंघात गृह मतदान घेण्यात आले. मलबार हिल मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले.
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात.
कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’
वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला आहे. काही मतदारसंघात पक्ष विजय प्रतिष्ठाचा करण्यात आला आहे. भाजपसाठी आर्वी पाठोपाठ देवळीची जागा फार मनावर घेण्यात आल्याचे दिसून येते.
South Nagpur Vidhan Sabha Election 2024: नवीन चेहऱ्याला पसंती देण्याकडे ‘दक्षिण’चा कल
New Face Chance for South Nagpur Vidhan Sabha Election 2024 : दक्षिण नागपूरमध्ये मागील चार निवडणुकांपैकी दोनवेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपला यश मिळाले आहे. भाजप व काँग्रेसने या निवडणुकीत जुनेच उमेदवार कायम ठेवले.
हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरालगत उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. आता मात्र या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. सत्ताधारी भाजप उद्योगांना हव्या त्या सुविधा देऊ शकले नाहीत. परिणामी, ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
उद्धव ठाकरेंकडून पुत्रप्रेमापोटी युतीधर्म तोडून विश्वासघातच, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे टीकास्त्र
कराड : महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेने हिंदुत्व अन् विकासाच्या मुद्द्यावर २०१९ ची निवडणूक लढवून बहुमत मिळवले. परंतु, उद्धव ठाकरेंनी पुत्रप्रेमापोटी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याची टीका करताना, मात्र एकनाथ शिंदे यांनी धाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राच्या विकासाला गती दिल्याचे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम
अंबरनाथ: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा स्वतःचा उमेदवार आहे. त्यामुळे पक्ष एकसंघपणे उमेदवाराच्या पाठीशी आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नाही. हे सगळे खोटे वृत्त असल्याची माहिती वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. वंचितचे काही माजी पदाधिकारी ठाकरे गटाचा प्रचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र संतांची भूमी येथे "बटेंगे तो कटेंगे"ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उपस्थित जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत असताना "बटेंगे तो कटेंगे" "एक रहेंगे सेफ रहेंगे " असे ठिकठिकाणी सांगत आहेत.
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!
विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
अमरावती जिल्ह्यात ‘डीएमके’ घटक निर्णायक ठरणार?
अमरावती जिल्हा सुरूवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विधानसभा असो की लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली.
‘कराड उत्तर’ची निवडणूक मतदारांनीच हातात घेतली, भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांचा दावा
कराड : ‘कराड उत्तर’च्या आमदारांनी २५ वर्षांत काहीच केले नाही. त्यांना आणखी संधी दिली, तरी ते काहीही करणार नसल्याने मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचा दावा ‘कराड उत्तर’चे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांनी केला. चोरे विभाग विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवला गेल्याची टीका त्यांनी केली.
‘महायुती’तर्फे भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोज घोरपडे हे आपल्या प्रचारार्थ चोरे (ता. कराड) येथे बोलत होते. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, भैयासाहेब साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
नवी मुंबई ः खारघर उपनगरामध्ये पुढील काही मिनिटांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे. या सभेत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे नागरिकांना आवाहन करणार आहेत. मात्र मागील आठवडाभरापासून खारघर उपनगरातील स्वच्छतेचा कायापालट केला जात आहे. दुपारचे ऊन डोक्यावर असले तरी स्वच्छता कर्मचारी रस्ते स्वच्छ करण्यात मग्न आहेत.
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित २४ ठिकाणी छापे टाकले.
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. पहिल्यांदाच पवार यांनी चिंचवडमध्ये रोड-शो काढला. पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्राचारार्थ पवार यांनी चिंचवडमध्ये रोड-शो काढला.
“राणा दाम्पत्याला अमरावती जिल्ह्यात भाजप संपवायची आहे”,बच्चू कडू यांची टीका
अमरावती : देशातील एवढा मोठा पक्ष रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या दावणीला बांधून ठेवून भाजपला कमी करण्याचा त्यांचा डाव आहे. अर्थात पुढे ‘स्वाभिमान’ चालेल आणि भाजप संपेल, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली आहे.
मुनगंटीवार रावत यांच्या परस्परांना, विजयाच्या शुभेच्छा, जोरगेवार पडवेकर यांचा सोबत चहा
चंद्रपूर : निवडणुकीच्या रिंगणातील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा आदर, सन्मान करणे सुसंस्कृतपणाचे लक्षणं मानले जाते.चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चंद्रपूर या दोन विधानसभा मतदार संघात हे चित्र पाहायला मिळाले.
हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
मतदारसंघात कामगार, मजूर, दलित लक्षनीय संख्येत स्थान राखून आहेत. युतीतील सेना व आघाडीतील काँग्रेस येथे गलीतगात्र असल्याची स्थिती आहे.
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे. तर याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविणारे साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून, त्यांची सभादेखील आजच या मतदारसंघात होणार आहे.
तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !
तब्बल वीस वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मात्र, २०१९ मध्ये ही जागा राष्ट्रवादीने भाजपकडून हिसकावून घेतली.
Nagpur Assembly Election 2024: भाजप स्टार प्रचारकांच्या सभा फक्त पक्षाच्या उमेदवारांसाठीच, महायुतीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष
नागपूरमध्ये या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या सभा या फक्त भाजप उमेदवारांसाठीच आहेत, मित्र पक्ष शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या (अजित पवार ) उमेदवारासाठी नाही हे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारांची आंदोलक, गुंतवणूकदारांना साद; बदलापूर अत्याचार, सागर इन्व्हेस्टमेंट प्रकरणातील संबंधितांना पाठिंब्यासाठी हाक
काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणाची झळ देशभर पोहोचली. त्यानंतर उभ्या करण्यात आलेल्या आंदोलनात हजारोंनी सहभाग नोंदवला. तर त्यापूर्वी सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यात अनेकांची कोट्यावधींची फसवणूक झाली. या दोन प्रकरणात पुढाकार घेऊन लढा देणारे नेतृत्व आज विधानसभेच्या रिंगणात आहेत.
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनीक्षेपक तसेच उमेदवाराच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जात आहे. या प्रचार आणि मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?
गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी, नवखे व बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी, त्यातच पक्षाअंतर्गत असलेली नाराजी, आदींचा विचार केल्यास राहुल गांधींची ही सभा मविआच्या उमेदवारांना तारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Live: सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
भाजपामध्ये दोन विचार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजा मुंडे वेगळं म्हणतात. याचा अर्थ भाजपाचेच दोन भाग झाले आहेत. दोन पक्ष फोडून पास होणाऱ्या देवाभाऊंनाच याचं उत्तर विचारायला हवं. त्यांच्या पक्षाचे विचारांनीच दोन भाग झाले आहेत. आमचे पक्ष फोडताना आईसचा वापर झाला होता. इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झाले आहेत. भाजपात फिफ्टी-फिफ्टी असे मतभेद झाले आहेत. विचारांमध्ये हे हाल आहेत, सरकार कसे चालवणार हे? - सुप्रिया सुळे</p>
Maharashtra Vidhan Sabha Election Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संभाजीनगरमध्ये सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संभाजीनगरमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा होणार आहे. थोड्याच वेळात मोदींचं सभास्थळी आगमन होईल...
Maharashtra Vidhan Sabha Election Live: दिलीप वळसे पाटलांचा शरद पवारांना इशारा!
आज विरोधी पक्षाच्या लोकांची सभा झाली. बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. पण आज मी त्यावर काही बोलत नाही. १८ तारखेला आपली समारोपाची सभा होईल. त्यावेळी मी या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं दिल्याशिवाय राहणार नाही. शेवटी, राजकारणात एक दिवस नाही तर ४० वर्षं मी काम केलं आहे. या काळात आपल्या संसारात चांगल्या प्रकारची स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण कामं केली आहेत. पण आज मुख्य प्रश्न हा आहे की आपलं पाणी खात्रीशीररीत्या आपल्याला मिळेल की नाही.डिंभे धरणातलं पाणी नगर जिल्ह्याला जाणार असेल, तर आपलं संभाव्य नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्याबाबत शरद पवार हेदेखील एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. राजकारणात अनेक गोष्टी बदलत असतात. त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे - दिलीप वळसे पाटील
जळगाव जामोदमध्ये भाजपची घोडदौड थांबणार?
बुलढाणा : मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’यात्रेमुळे प्रकाशझोतात आलेल्या जळगाव जामोद मतदारसंघाच्या यंदाच्या लढतीत भाजप अर्थात आमदार संजय कुटे यांची घोडदौड थांबणार का, असा प्रश्न प्रचाराच्या मध्यावरच ऐरणीवर आला आहे.
Akola West Assembly Constituency : ‘अकोला पश्चिम’मध्ये धार्मिक राजकारणाचा ज्वर चढला
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लक्षवेधी लढत होत आहे. भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यात अटीतटीचा सामना आहे. या मतदारसंघात जातीयऐवजी धार्मिक राजकारणाचा ज्वर चढल्याचे चित्र असून मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.