Maharashtra Election Voting Highlights: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
Maharashtra ZP and Panchayat Samiti Election 2026 Live Updates
खळबळजनक! मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाबाबत ध्वनीफित; आमदार तानाजी सावंतांचा आवाज असल्याचा आरोप
‘पर्यावरण वाचवा… लोकशाही बळकट करा’ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावशीतील सखी मतदान केंद्रातून निसर्ग आणि मतदानाचा सुंदर संगम
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५०.१० टक्के मतदान
VIDEO : शुभमंगल झाल्यावर वधूवराची वरात मतदान केंद्रावर
सांगली : सौर उर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड, निषेधार्थ मतदानावर बहिष्कार
सांगली : सौर उर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड, निषेधार्थ मतदानावर बहिष्कार
रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाची संथ सुरुवात; अनेक ठिकाणी मशीन बिघाडामुळे मतदारांची गैरसोय
रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाची संथ सुरुवात; अनेक ठिकाणी मशीन बिघाडामुळे मतदारांची गैरसोय
ZP & Panchayat Election Voting Live Updates: कराडमध्ये वातावरण तापले! बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शनिवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनाने मतदानासाठी मोठी तयारी केली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील ४८६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे.
ZP & Panchayat Election Voting Live Updates: लग्नाआधी मतदान; रोहा येथील श्रद्धा कुंडलेचा लोकशाहीचा आदर्श
रायगडच्या रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील श्रद्धा गणेश कुंडले हिने लग्नाच्या बहुल्यावर चढण्याआधीच आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत, सर्व मतदारांनी आपल्या संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा उपयोग करावा, असे आवाहन तिने केले.
ZP & Panchayat Election Voting Live Updates: मतदानापासून रोखल्याने परभणीत मतदान केंद्रावर वाद
परभणीच्या राणीसावरगाव येथे मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला. महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकाऱ्यावर भाजपाची दलाली करत असल्याचा आरोप करत, आपल्याला जाणूनबुजून मतदानापासून रोखण्यात आल्याचा दावा केला आहे.या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद सुरूच राहिला. अखेर महंतांनी मतदान न करताच मतदान केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
ZP & Panchayat Election Voting Live Updates: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी ११.३० पर्यंत २२.२६ टक्के मतदान
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी ११.३० पर्यंत २२.२६ टक्के मतदान झाले आहे.
शासन दरबारी अजित पवार अद्यापही जिवंतच…
ZP & Panchayat Election Voting Live Updates: आमदार रोहित पाटील यांनी अंजनी गावात आजीसोबत बजावला मतदानाचा हक्क
आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी या आपल्या मूळ गावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केले. अंजनी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आमदार रोहित पाटील यांनी आजी भागीरथी पाटील यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
ZP & Panchayat Election Voting Live Updates: 'मुलाच्या बोटाला फक्त शाई लावली, पण मतदान मीच केलं' - विलास भुमरेंचं स्पष्टीकरण
मतदान केंद्रावर मतदान करताना आपल्यासह लहान मुलाला बरोबर नेल्याने आमदार विलास भुमरे यांच्यावर टीका होत आहे. याबाबत आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, तो लहान आहे. त्याला ईव्हीएम वगैरे काही कळत नाही. मी फक्त त्याच्या बोटाला शाई लावली. माझे मतदान मीच केले.
Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक : पहिल्या दोन तासांत ७.७४ टक्के मतदान; बारामतीत मतदारांमध्ये निरुत्साह...
सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदानासाठी रांगा
शिवसेनेचे (शिंदे) खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान करताना मुलाला बरोबर नेले. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावर मुलाच्या बोटाला शाई लावून त्यांनी ईव्हीएमचे बटण दाबताना मुलाला बरोबर नेले. यामुळे आता टीका होत आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची ई- केवायसी पुन्हा सुरू; आता फक्त दोनच प्रश्नांची द्यावी लागणार सांभाळून उत्तरे!
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आज उमेदवारांचे भवितव्य ठरविणार
"विमान अपघाताची थातूर-मातूर चौकशी; अजितदादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हे!" अमोल मिटकरी म्हणतात, "महाराष्ट्र पुरावा मागतोय"...
साताऱ्यात महायुतीच्या नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला
Tadoba Tiger Reserve : कुवानीच्या बछड्यांची जंगलातली धमाल, पर्यटकांनीही थांबवली वाहने...
नागपूरात नवनिर्वाचित महापौरांनी ऐनवेळी टाळली स्थायी समिती सदस्यांची निवड! भाजपअंतर्गत नाराजी…
चिपळूण मध्ये चार नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष
VIDEO : सचिन तेंडुलकरच्या हृदयात 'जुनाबाई'ची खास जागा! आता चार बछड्यांनीही लावले वेड...
नव्या कारभाऱ्यांनाे, 'लोकमान्य टिळक, महात्मा फुले' हे पुण्याचे नगरसेवक होते याची आठवण ठेवा!
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक…मतदानासाठी यंत्रणा सज्ज
जामगे येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात मतदान केंद्र सज्ज (संग्रहित छायाचित्र)
