राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजली जाणारी ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असल्यानं सर्वांनीच ताकद लावली होती. अखेर नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल लागलाय. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणाला किती जागा? जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतरनिकाल जाहीरएकूण जागाअकोला११२१९१४१४धुळे८२३२०१५१५नंदूरबार४३१३०११११नागपूर३०२९२१६१६पालघर५५४०११५१५वाशिम२१५२४१४१४एकूण२३१२१७१७१६८५८५ जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल २०२१ कोरोना संसर्ग आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. महाराष्ट्रातील या ६ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत चांगलीच 'काटे की टक्कर' पाहायला मिळाली. Latest Updates: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार १. केळवद - सुमित्रा कुंभारे - काँग्रेस२. वाकोडी - ज्योती सिरसकर - काँग्रेस३. राजोला - अरुण हटवार - काँग्रेस४. गुमथाळा - दिनेश ढोल - काँग्रेस५. वदोडा - अवंतीका लेकुरवाळे - काँग्रेस६. आरोली - योगेश देशमुख - काँग्रेस७. करंभाड - अर्चना भोयर - काँग्रेस८. निलडोह - संजय जगताप - काँग्रेस९. गोधणी (रेल्वे) - कुंदा राऊत - काँग्रेस१०. येनवा - समीर उमप - शेकाप११. डिगडोह - रश्मी कोटगुले - राष्ट्रवादी१२. भिष्णुर - प्रवीण जोध - राष्ट्रवादी१३. बोथीय पालोर - हरिष उईके - गोंडवाना१४. पारडशिंगा - मीनाक्षी सरोदे - भाजप१५. सावरगाव - पर्वता काळबांडे - भाजप१६. डिगडोह-इससानी - अर्चना गिरी - भाजप अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार (एकूण जागा : 14) १. अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना२. घुसर : शंकरराव इंगळे वंचित३. लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष४. अंदूरा : मीना बावणे : वंचित५. दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी६. अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष७. कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित८. बपोरी : मायाताई कावरे : भाजप९. शिर्ला : सुनील फाटकर : वंचित१०. देगाव : राम गव्हाणकर : वंचित११. कानशिवनी : किरणताई आवताडे/मोहड : राष्ट्रवादी१२. कुटासा : स्फुर्ती गांवडे : प्रहार१३. तळेगाव : संगिता अढाऊ : वंचित१४. दानापूर : गजानन काकड : काँग्रेस एकूण जागा : १४निकाल जाहीर : १४ वंचित : ६अपक्ष : २शिवसेना : १+ प्रहार १राष्ट्रवादी : २भाजप : १काँग्रेस: १ वाशिम जिल्हा परिषद विजयी उमेदवार (एकूण जागा : 14) १.काटा : संध्या देशमुख : काँग्रेस२. पार्डी टकमोर : सरस्वती चौधरी : अपक्ष३. उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना४. आसेगाव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी५. कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी६. दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस७. फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप८. कुपटा : उमेश ठाकरे : भाजप९. तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी१०. कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस११. गोभणी : पूजाताई भुतेकर : जनविकास१२. भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी१३. पांगरी नवघरे : लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित१४. भामदेवी : वैशाली लळे : वंचित एकूण जागा : १४निकाल जाहीर : १४ वंचित : २अपक्ष : १शिवसेना : १राष्ट्रवादी : ५भाजप : २काँग्रेस : २जनविकास : १ जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या जागा नागपूर – १६धुळे – १५अकोला – १४वाशिम – १४नंदूरबार – ११पालघर – ०२ जिल्ह्यानिहाय पंचायत समिती जागा नागपूर – ३१धुळे – ३०अकोला – २८वाशिम – २७नंदूरबार – १४पालघर - १४ नंदूरबार नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांवरील उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल घोषित झाला. अकोला अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद जागा आणि २८ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीतील मतदारांची संख्या ३ लाख ७१ हजार ६९० इतकी होती. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. वाशिम वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी तर पंचायत समितीच्या २७ गणासाठी निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ८२ उमेदवार निवडणूक मैदानात होते. पंचायत समितीच्या 27 गणांसाठी 135 उमेदवार रिंगणात होते. “शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया धुळे आणि नंदूरबार खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी मतदान झालं. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.