Zilla Parishad Election Results: आज राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महापालिका निवडणुकांनंतर घसरत चाललेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच खेड्यापाड्यांतून म्हातारे-कोतारे, आयाबाया आणि तरुणाई मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे आश्वासक चित्र दिसले होते.
या निवडणुका छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी पार पडल्या होत्या. निकालाच्या प्रत्येक अपडेट येथे वाचता येईल.
परभणी जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
पक्षीय बलाबल (कंसात मागील निवडणकीत जिंकलेल्या जागा)
भारतीय जनता पक्ष – २४(५)
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष – १५(२४)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष -६ (१३)
शिवसेना – ५(१३)
काँग्रेस – ३(६)
अपक्ष – १(२)
एकूण – ५४
जिल्हा परिषदेच्या ५४ गटातील विजयी उमेदवार
जि. प. गट – उमेदवार- पक्ष
१)पेठशिवणी -सविता संतोष मुरकुटे – भाजप
२) बनवस – शांतीस्वरूप सुरेशराव जाधव – भाजप
३) चाटोरी – अमित घनदाट – भाजप
४)रावराजूर – मंगलाबाई रोकडे – शिवसेना उबाठा
५)शेळगाव – श्रीकांत विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस
६)उखळी बुद्रुक – माया मुजमुले- राष्ट्रवादी काँग्रेस
७)नरवाडी – विद्याताई धोंडगे – भाजप
८)वझर – रोहिणी ज्ञानेश्वर वटाणे -भाजप
९)वाघी धानोरा – रोहित नामदेव चव्हाण – भाजप
१०)सावंगी म्हाळसा – लता विजयकुमार वाकळे – भाजप
११) आडगांव बाजार – डॉ. देवराव गंगाराम क-हाळे -भाजप
१२) भोगाव – कृष्णकांत शिवाजीराव मोरे – राष्ट्रवादी काँग्रेस
१३) धारासुर – शोभा कदम – भाजप
१४) महातपुरी – कुशावर्ता संभाजी पोले – भाजप
१५) गुंजेगाव -करुणाताई कुंडगीर – भाजप
१६)कोद्री – पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे – भाजप
१७) राणी सावरगाव – सय्यद अल्ताफ सय्यद अकबर – भाजप
१८) मरडसगाव – शिल्पा रामराव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
१९)इसाद -सावित्रीबाई राजेश फड – शिवसेना
२०)ताडबोरगांव – वैशाली पंकज आंबेगावकर – राष्ट्रवादी काँग्रेस
२१)केकरजवळा -कौशल्याबाई तुकाराम शिंदे – शिवसेना
२२) रामपुरी – गीतांजली दत्तराव जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
२३)कोल्हा -परमेश्वर पंढरीनाथ निर्वळ- भाजप
२४) वरुड – संगीता राजेंद्र थिटे – भाजप
२५)चारठाणा -सरुबाई शंकर जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
२६)बोरी – दिपाली अजय चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस
२७)वस्सा – मनीषा अभिजीत पारवे – भाजप
२८)कौसडी – माणिक शेषराव हरकळ – राष्ट्रवादी काँग्रेस
२९)लिंबा – रुक्मीनबाई पंडितराव भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस
३०)बाभळगांव – वैजंताबाई अण्णासाहेब रणेर – राष्ट्रवादी काँग्रेस
३१) हादगांव बुद्रुक – अजिंक्य अनिलराव नखाते – राष्ट्रवादी काँग्रेस
३२)कासापुरी – अरुण ज्ञानेश्वर कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस
३३)देवनांद्रा – सुमनबाई चक्रधर उगले – शिवसेना
३४)एरंडेश्वर – रितेश रावसाहेब काळे – शिवसेना उबाठा
३५)ताडकळस – केशरबाई गंगाधर जल्लारे – शिवसेना उबाठा
३६) वझुर – बेबीताई शिवाजी कुकर – शिवसेना उबाठा
३७)गौर – कोमल गंगाधर पारवे – राष्ट्रवादी काँग्रेस
३८)चुडावा – भरत मोहनलाल घनदाट – भाजप
३९) कावलगाव – अर्चना उत्तम ढगे – अपक्ष
४०) कुपटा – योगिता रणजीत मोरे – भाजप
४१)वालूर – साक्षी नागेश साडेगांवकर – भाजप
४२)देऊळगांव गात – प्रीती आशिष डख – भाजप
४३)चिकलठाणा बुद्रुक – प्रसाद भगवानराव डासाळकर – भाजप
४४)रवळगाव – डॉ. सविता संजय रोडगे – भाजप
४५)सिंगणापूर – पांडुरंग बालासाहेब खिल्लारे – शिवसेना उबाठा
४६)झरी – दिलीप प्रभाकरराव देशमुख – भाजप
४७)दैठणा – जोत्स्ना गणेशराव घाटगे – काँग्रेस
४८)पोखर्णी नृसिंह – ऐश्वर्या अजय चव्हाण – भाजप
४९)लोहगांव – अजित अनिल वरपूडकर – काँग्रेस
५०) पेडगांव – जितेंद्र गोपाळ देशमुख – काँग्रेस
५१)पिंगळी – पूजा अनिल सावंत – शिवसेना
५२)टाकळी कुंभकर्ण – प्रतिक्षा प्रभूलाल जैस्वाल – शिवसेना उबाठा
५३)जांब – संग्राम प्रतापराव जामकर – राष्ट्रवादी काँग्रेस
५४) टाकळी बोबडे – सुचिता आनंदराव भरोसे – शिवसेना
ZP Election 2026 Results Updates: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निकालांची अपडेट जाणून घेऊया...
Satara ZP Result: हातावर देवेंद्र फडणवीस कोरलेल्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांच्या पत्नीचा पराभव; २२ वर्षीय तरुणी ठरली 'जायंट किलर'
Patan Panchayat Samiti Result: पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईच 'किंग', पंचायत समितीवर एकहाती सत्ता; भाजपात प्रवेश केलेल्या पाटणकरांनी जिंकली केवळ एक जागा
२४ जागांवर विजय मिळवून परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व
दोडामार्गात महायुतीचा 'क्लीन स्वीप'! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व; ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा; ५० पैकी ४१ जागा जिंकत राणे यांचा बालेकिल्ला राखला
वेंगुर्ले पंचायत समितीवर 'महायुती'चा झेंडा, पण जिल्हा परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रोखले पाऊल! पाहा धक्कादायक निकाल
खेड-आळंदीत ठाकरेंच्या शिवसेनेचा धमाका! दिग्गज नेत्यांविनाच मिळवली एकहाती सत्ता; पण आमदाराच्या बहिणीला मोठा धक्का
जिल्हा परिषदेत ‘घराणेयशाही’चा बोलबाला! कुणाची पत्नी, तर कुणाचा मुलगा; निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांनी मारली बाजी
मराठा आरक्षण आंदोलनातील आक्रमक चेहरा मंगेश साबळेंना पुन्हा धक्का; वडोदबाजारमध्ये भाजपच्या गोपाळ वाघांचा विजय
Ratnagiri ZP Election Result 2026 Live: कसबा जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेला मोठा धक्का; उबाठाच्या नवख्या विशाखा कुवळेकर विजयी, रचना महाडिक पराभूत

कोल्हापूर जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असून उबाठा शिवसेनेच्या नवख्या उमेदवार विशाखा विजय कुवळेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कुवळेकर यांनी शिंदे सेनेच्या रचना महाडिक यांचा पराभव करत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली.
पारंपरिकदृष्ट्या शिंदे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा गटात नवख्या उमेदवाराने मिळवलेले हे यश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. या निकालामुळे गटातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.
विजय घोषित झाल्यानंतर विशाखा कुवळेकर यांनी मतदार बांधव आणि भगिनींचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच विकासकामांना प्राधान्य देत कोणत्याही परिस्थितीत राजकारण आड येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Chhatrapati Sambhajinagar ZP Result live: मराठा आरक्षण आंदोलनातील मंगेश साबळे पुन्हा पराभूत
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यापेक्षा वेगळा सूर आळवणारे मंगेश साबळे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिल्हा परिषदेच्या वडोदबाजार गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या गटातून भाजपाचे उमेदवार गोपाळ वाघ यांनी विजय मिळवला.
वडोदबाजार गटात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत मंगेश साबळे यांना ८,२३४ मते मिळाली, तर विजयी उमेदवार गोपाळ वाघ यांनी ९,८३१ मते घेत आघाडी कायम ठेवली. या लढतीत काँग्रेसच्या कविता मेटे यांनीही जोरदार लढत देत ८,०४१ मते मिळवली.
लातूरमध्ये भाजप मागच्या बाकावर पण महायुतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा, काँग्रेसचा २३ गटांमध्ये विजय, राष्ट्रवादीचा जोरही वाढला
Latur ZP Election Result Live 2026: लातूरमध्ये भाजप मागे, तरी महायुती सत्तेच्या उंबरठ्यावर; काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादीचा निर्णायक ‘किंगमेकर’ रोल
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मागे पडला असला तरी ‘महायुती’च्या सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेसने सर्वाधिक २३ जागा जिंकून जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा काँग्रेसला गाठता आलेला नाही.
भाजपने १८ गटांमध्ये विजय मिळवला असून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीमुळे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
Solapur ZP Election Result live: मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचा पराभव
सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती.
ZP Election Result 2026: आठ ते नऊ ठिकाणी भाजपाचा अध्यक्ष होणार
राज्याती आठ ते नऊ जिल्हापरिषदेत भाजचा अध्यक्ष होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
माळशिरस तालुक्यात यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्रई जयकुमार गोरे आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती....
Raigad ZP Election Result 2026 Live: सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता यांचा विक्रमी मताधिक्यांनी विजय

रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे या ४६५० विक्रमी मताधिक्यांनी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहे.
Raigad ZP Election 2026 Result Live: आमदार महेंद्र दळवी यांच्या सुन अदिती दळवी यांचा विजय

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुन अदिती दळवी यांचा अलिबाग मधील चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांची प्रमुख लढत शेकापचा प्रविणा घासे यांच्यासोबत झाली होती.
झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत मनसेनंही खातं उघडलं, पाहा विजयी उमेदवारांची यादी
झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत मनसेनंही खातं उघडलं, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Sangali ZP Election Live Updates: सांगली जिल्हा परिषदेत कोणाचाही स्पष्ट बहुमत नाही; भाजप सर्वात मोठा पक्ष
पक्षीय बलाबल (एकूण जागा : ६१):
भाजप – १८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – १५
काँग्रेस – ११
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ७
शिवसेना (शिंदे गट) – ७
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – १
जनसुराज्य – १
रयत क्रांती संघटना (सदाभाऊ खोत) – १
Ratnagiri ZP Election Result Live 2026: रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायती समिती निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यावर महायुतीची एकतर्फी सत्ता
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत शिंदे गटाच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने विरोधकांचे राजकीय बळ अक्षरशः उद्ध्वस्त करत एकतर्फी सत्ता काबीज केली आहे.
तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत रत्नागिरीच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून उभ्या असलेल्या माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबीयांपैकी केवळ एक जण विजयी तर चार जण पराभूत झाले आहेत. भाजपचे उमेदवार असलेले वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर व सुनबाई प्रेरणा यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. वरपुडकरांची घराणेशाही मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत नाकारल्याचे स्पष्ट झाले.
संभाजीनगर; पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी
संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पाचोड गटातून संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झाले आहेत.
Ratnagiri ZP Winner List: रत्नागिरीत मनसेनं उघडलं खातं, शृंगारतळीत उमेदवार विजयी, वाचा सविस्तर यादी…
Ratnagiri ZP Election Result 2026 Live: रत्नागिरीत ठाकरे गटाचे खाते उघडले; विक्रांत जाधव यांचा असगोलीत विजय
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अखेर खाते उघडले आहे. असगोली जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी विजय मिळवला. विक्रांत जाधव हे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आहेत.
या विजयामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय दिलासा मिळाला असून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Solapur ZP Election Result Live 2026: माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. ते धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत. विशेष म्हणजे पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद गटात विजय मिळवत पुनरागमन केले आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार अतुल पवार विजयी झाले. या निवडणुकीत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे यांना पराभव स्वीकारावा लागला.
आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या दुःखातून महाराष्ट्र अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसह जे कोणी विजयी होतील, त्यांना माझे नम्र आवाहन आहे की त्यांनी आपला विजय शक्य तितक्या साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
Ratnagiri ZP Result Live Updates: लांजा तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व; भांबेड जि.प. गटात विनया गांगण विजयी
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असगे आणि भांबेड जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. लक्षवेधी ठरलेल्या भांबेड जिल्हा परिषद गटातील लढतीत शिवसेनेच्या विनया गांगण यांनी विजय मिळवला.
पंचायत समिती भांबेड गणातून युतीचे भाजप उमेदवार शैलेश खामकर विजयी झाले. तसेच प्रभानवल्ली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेश पत्की यांनी विजय संपादन केला.
या निकालामुळे लांजा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ratnagiri ZP Election Result Live 2026: हातखंबा जिल्हा परिषद गटात शिंदे गटाचे सुयोग कांबळे विजयी
रत्नागिरी जिल्ह्यातील हाय व्होल्टेज ठरलेल्या हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे सुयोग कांबळे यांनी विजय मिळवला. त्यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचा पराभव करत या गटात बाजी मारली.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमदी गणात काँग्रेसच्या उमेदवार संगीता बाबूराव सांवत यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. या निकालामुळे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद निकाल २०२६

