अलिबाग – कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून ‘महाविस्तार अॅप’ कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवत आहे. हे महाविस्तार अॅप सध्या शेतकऱ्यांसाठी डिजीटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असून रायगड जिल्हयातील साडे अठरा हजारांहून अधिक शेतकरयांनी याचा वापर करीत शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची कास धरली आहे.
हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालले आहे. या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस कल वाढत चालला असून त्यामुळे हे महाविस्तार अॅप कृषी क्रांतीत शेतकऱ्यांचा डिजीटल फ्रेंड बनले आहे. या अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक सल्ले देत त्यावर विविध उपाययोजना सांगून कृषी क्रांतीत आमुलाग्र बदल घडवला जात आहे. रायगड जिल्ह्यातील 18 हजार 645 शेतकरयांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे.
असे मिळवा महाविस्तार अॅप
शेतकऱ्यांना वापर करण्याच्या दृष्टीने हे अॅप सुलभ व सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करता येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा म्हणून कृषी विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजाणारे महाविस्तार एआय हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असून या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे अॅप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या 21 मेपासून हे अॅप कार्यान्वित झाले आहे. या अँपद्वारे शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शेतीशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, कीड व रोग ओळख व त्यावर उपाय, सर्व पिकांचे बाजारभाव, आपल्या भागातील सुविधा गोदाम, औजारे आदींची इत्यंभूत माहिती, तसेच, पीक नियोजन आणि कीडरोग नियंत्रणासाठी कृषीविषयक माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
या अॅपमुळे आधुनिक शेती कशी करावी, पिकांसाठी कोणती खते व कीटकनाशकांचा वापर करावा आणि कोणती खते व कीटकनाशकांचा वापर टाळावा, याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होतेच पण शेतपिकांच्या उत्पादन वाढीसाठी देखील मदत होत आहे. शेतकऱ्यांसाठी डिजीटल सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका बजावत असून हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालले आहे. या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांना वापर करण्याच्या दृष्टीने हे अॅप सुलभ व सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून हे महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करता येते, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा म्हणून कृषी विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल क्रांतीत सहभागी व्हावे. – वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
