सावंतवाडी : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे. तालुक्यावर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून, जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर आणि पंचायत समितीच्या १६ पैकी १४ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी भाजपला ६ जागा मिळाल्या आहेत, तर शिंदे सेनेला १ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांची नावे : मनोज रावराणे (हरकुळ बुद्रुक-भाजप), सुप्रिया संदीप मेस्त्री (कलमठ-भाजप), शीतल दळवी (कळसुली-भाजप), संदेश उर्फ गोट्या सावंत (नाटळ-भाजप), संतोष पारकर (कासार्डे-भाजप), प्राची ईस्वलकर (खारेपाटण-भाजप), रुहिता तांबे (जानवली-शिंदेसेना) आणि फोंडाघाट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजन चिके विजयी झाले आहेत.
पंचायत समिती निकाल:
पंचायत समितीच्या १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचा वरचश्मा पाहायला मिळाला. यामध्ये भाजपने १४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असून शिंदे सेनेने २ जागा जिंकल्या आहेत.
विजयी उमेदवार:
दिव्या पेडणेकर (हरकुळ बुद्रुक-भाजप), हर्षदा वाळके (नांदगाव-भाजप), राजेश उर्फ सोनू सावंत (वरवडे-भाजप), महेश्वरी चव्हाण (जानवली-भाजप), सायली कृपाळ (नाटळ-भाजप), संजना राणे (बिडवाडी-भाजप), गुरुप्रसाद शिंदे (खारेपाटण-शिंदेसेना), राजेश जाधव (तळेरे-भाजप), सहदेव उर्फ अण्णा खाडये (कासार्डे-भाजप), पवन भालेकर (फोंडाघाट-भाजप), मानसी मराठे (लोरे-भाजप), चंद्रहास उर्फ बबलू सावंत (हरकुळ खुर्द-भाजप), गुरुनाथ वर्देकर (कलमठ-भाजप), लक्ष्मण गावडे (कळसुली-भाजप), अक्षता राणे (ओसरगाव-शिंदेसेना) आणि राजश्री पवार (नरडवे-भाजप).
पक्षीय बलाबल:
जिल्हा परिषद (एकूण ८ जागा): भाजप – ६, शिंदे शिवसेना – १, अपक्ष – १.
पंचायत समिती (एकूण १६ जागा): भाजप – १४, शिंदे शिवसेना – २.
या विजयामुळे कणकवली तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
