केंद्र सरकारच्या कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२६-२७ च्या खरीप हंगामात ९१.०९ लाख हेक्टर राहिले, मागील वर्षाच्या खरीप हंगामात ९४.०८ लाख हेक्टर होते, तर उत्पादन २८३.०३ लाख टन राहिले. यंदा लागवडीत २.९९ लाख हेक्टरने घट झाली आहे. उत्पादनाचा अधिकृत अंदाज अद्याप जाहीर झालेला नाही.
गतवर्षाच्या तुलनेत यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मका पिकाला वेळेत आणि पुरेसा पाऊस झाला, तर भरघोस उत्पादन निघते. पण पुरेसा पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. यंदा लागवडीतच दोन लाख हेक्टरने घट झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील मक्याच्या उत्पादनात मोठी घट होणे अपेक्षित आहे.
गतवर्षी खरीप हंगाम काढणीला आलेल्या मक्याला प्रति किलो सरासरी १५ ते १७ रुपयांपर्यंत दर मिळत होता. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा दर सरासरी २५ ते २७ रुपये किलोवर गेला आहे. व्यापारी , ग्राहकांना सुद्धा यंदा पावसाअभावी कमी उत्पादनाचा अंदाज असल्यामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, ही वाढ केवळ मक्यातच नाही तर सर्व अन्नधान्य पिकांत हळूहळू होऊन एकूण सर्वच अन्नधान्यांच्या दरात महागाईत येण्याची शक्यता दाट शक्यता आहे.
कोंबडी, पशुखाद्यासाठी ६० टक्के मक्याचा वापर
भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण मक्यापैकी सुमारे ६० टक्के मका कोंबडी खाद्य किंवा पशुखाद्यासाठी वापरला जातो. कोंबडी खाद्यात मक्याचे प्रमाण सर्वाधिक ६० टक्क्यांपर्यंत असते. भारतीयांना महामंडळाच्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये भारतातील मक्याच्या एकूण वापरापैकी सुमारे ५६ टक्के वापर पशुखाद्य उद्योगात झाला होता. २०२४-२५ साठी हा वाटा सुमारे ५९ टक्के होता. मक्याचे दर वाढल्यामुळे कोंबडी खाद्य आणि पशुखाद्याचे दर वाढणार आहेत. कोंबडी खाद्याचे दर वाढल्याचा थेट परिणाम म्हणून अंडी आणि मांस, चिकनच्या दरात वाढ होणार आहे. पशुखाद्यच्या दरात वाढ झाल्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे दूध, ताक, दही, लोणी, तूप श्रीखंड आदी दुग्धजन्य पदार्थांच्या दरात ही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इथेनॉल उद्योगाला मका मिळणे कठीण
मागील पाच वर्षात इथेनॉलच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. पहिल्या टप्प्यात साखर कारखाना आधारित इथेनॉलचे प्रमाण जास्त होते, त्यानुसार त्यानंतर मका, तांदूळ आधी अन्नधान्यांपासून इथेनॉल उत्पादनाला चालना मिळाली आहे. त्यात मक्यापासून उत्पादित इथेनॉलला दरही चांगला मिळाल्यामुळे मक्यापासून इथेनॉल उत्पादनाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२४-२५ इथेनॉल पुरवठा वर्षात भारतात इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे १३१ लाख टन मका वापरला गेला. २०२५-२६ मध्ये ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत मका वापरून सुमारे ३४५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला होता, असे ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
धन्यवाद इथेनॉल उद्योगही अडचणीत
यंदा देशात उसाचे उत्पादन कमी आहे, त्यामुळे उसाच्या पाकापासून, उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती न करता जास्तीत जास्त साखर निर्मिती करण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. एकीकडे उसापासून इथेनॉल निर्मिती कमी होणार आहे , दुसरीकडे अन्नधान्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे अन्नधान्य पासूनही इथेनॉलचे उत्पादन सरासरीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशात एकूणच इथेनॉलचे उत्पादन कमी राहील, असा अंदाज आहे. अन्नधान्यापासून इथेनॉल न करता अन्नधान्याचा बाजारात पुरवठा करून दर नियंत्रित ठेवण्याला सरकारचे प्राधान्य राहणार आहे, त्यामुळे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेला इथेनॉल उद्योग अडचणीत देण्याची शक्यता आहे.
उपलब्ध अन्नधान्याचा काटेकरपणे वापर गरजेचा
एकूणच देशात अपुऱ्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. खरीप उत्पादनात घट अपेक्षित आहेच. पण, रब्बी हंगामात अपेक्षित पाणी पुरवठा न झाल्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनावरील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील उपलब्ध अन्नधान्य पुढील वर्षापर्यंत पुरवून वापरावे लागणार आहे. देशात अन्नधान्याचा तुटवडा नसला तरीही अन्नधान्य मुबलक आहे, असेही नाही. १४० कोटींहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात अन्नधान्य मुबलक असू शकत नाही, ते काटकसरीने वापरावे लागणार आहे. पुढील वर्षभर अन्नधान्याच्या दरातील वाढ नियंत्रित ठेवणे सरकारसाठी जिकिरीचे होणार आहे.
dattaatray.jadhav@expressindia.com
