मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ मध्‍यरात्री उशिरा इर्टिगा कारला झालेल्‍या अपघातात मुंबईतील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्‍ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मोतीराम मोतीवाले व उषा मोतीवाले अशी मृतांची नावे आहेत. तर त्‍यांची सून मोहिनी यांच्यासह नात खुशी आणि नातू शान यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

अंधेरी चकाला येथील हे कुटुंब धार्मिक विधीसाठी कोंडणपूर येथे गेले होते . कार्यक्रम आटोपून ते पुण्‍याहून ओला कारद्वारे मुंबईत परतत असताना हा अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की, कारने डाव्‍या बाजूच्‍या क्रॅश बॅरीयरला धडक दिल्‍यानंतर क्रॅश बॅरीयर पुढचा दिवा फोडून मागच्‍या सीटपर्यंत आरपार घुसला होता. या अपघातातून चालक किरण गुरसुंड हा बचावला आहे .

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू