नगरजवळ भीषण अपघातात सहा ठार, दोन जखमी

नगर-सोलापूर राज्य महामार्गावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

नगर-सोलापूर राज्य महामार्गावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर नगरमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार ते पुण्यातील राहणारे असल्याचे समजते.
नगरपासून २५ किलोमीटरवर असलेल्या बनपिंपरी गावाजवळ हा अपघात झाला. नगरकडे येत असलेल्या तवेरा गाडीची सोलापूरकडे निघालेल्या टेम्पो ट्रेलरला गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की तवेरा गाडीचा चेंदामेंदा झाला आहे आणि गाडीतील सहा प्रवासी मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थानी तातडीने सर्वांना नगरमधील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
(संग्रहित छायाचित्र)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Major accident on nagar solapur road six passengers dead