सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या मुलासह सहाजणांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर सहाजण जखमी झाले आहेत. रविवारी (२२ मे) दुपारी चारच्या सुमारास मोहोळजवळ पेनूर येथे हा अपघात झाला.

मोहोळ येथे मागील तीन पिढ्यांपासून वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेल्या खान कुटुंबीयांमधील डॉ. आफरीन मुजाहीद खान-आतार (वय ३०) व त्यांचे पती डॉ. मुजाहीद इमाम आतार (वय ३५) आणि त्यांचा मुलगा अरमान (वय ५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तसेच डॉ. आफरीन यांचे बंधू इरफान नूरखाँ खान, त्यांच्या पत्नी बेनजीर खान आणि त्यांची मुलगी अन्यान यांचाही या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या
scrap shops Golvali fire
डोंबिवलीत गोळवली येथील भंगाराची ४० दुकाने आगीत खाक, जीवितहानी नाही

डॉ. आफरीन यांचा मुलगा अरहान (वय ८) याच्यासह दुसऱ्या वाहनातील अनिल हुंडेकरी (वय ३५), मनीषा मोहन हुंडेकरी, राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे व मंदाकिनी शेटे (सर्व रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्वांना वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. हुंडेकरी व शेटे कुटुंबीय सोलापुरात लग्नकार्य आटोपून आपल्या गावाकडे परत निघाले होते.

मोहोळ येथील प्रतिष्ठित डॉ. खान कुटुंबीयांतील डॉ. आफरीन खान-आतार व त्यांचे पती डॉ. मुजाहीद आतार, दोन्ही मुले आणि भाऊ-भावजयासह कौटुंबिक कामानिमित्त परगावी गेले होते. तेथून पंढरपूरमार्गे मोहोळकडे परत येत असताना त्यांच्या मोटारीला (एमएच १३ डीटी ८७०१) समोरून म्हणजे मोहोळहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या स्कार्पिओ मोटारीची (एमएच १३ डीई १२४२) जोराची धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की, डॉ. खान दाम्पत्य व त्यांच्या मुलासह सहाजणांनी जागेवरच जीव सोडला. या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस तातडीने पेनूर येथे अपघातस्थळी धावून आले. या अपघाताची प्राथमिक नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास चालू होत आहे.