नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने या मार्गावर गुरुवारीच सुरू झालेली वाहतूक शुक्रवारी पुन्हा एकदा बंद करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिली. 
पावसामुळे माळशेज घाटात शुक्रवारी सकाळी पुन्हा दरड कोसळली. दरडीमुळे मातीचा आणि दगडाचा भला मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद करावी लागली. माळशेज घाटात २४ जुलैला मध्यरात्री डोंगराचा कडा कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. शिळा सुरुंगाद्वारे फोडून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न महामार्ग विभागाकडून सुरू होते. गुरुवारी या मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली होती.

Story img Loader