धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश मधूनआलेल्या या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत रेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेऊन तेथील इटारसी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

१५ तारखेला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. काशी एक्सप्रेसमध्ये एक महिला आपल्या चार मुलींबरोबर प्रवास करत होती. डब्यात आरोपी सोनू अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रयत्न करत असताना, घाबरलेल्या मुलीने आईला सांगितले. मुलीच्या आईने सोनुला पकडून मारण्यास सुरुवात केली. डब्यात आरडाओरड सुरू झाल्यानंतर इतर इतर प्रवाशांनी देखील सोनुला बेदम चोप दिला. दरम्यान मुलीच्या आईने पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी तत्काळ वडिलांनी पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांना रेल्वे मधील सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी औरंगाबाद रेल्वे नियंत्रण कक्ष आणि इगतपुरी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मात्र रेल्वे पकडता आली नसल्याने त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. काशी एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर प्रवाशांनी पकडलेल्या सोनुला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनुवर गुन्हा दाखल करून मध्यप्रदेशातील इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.