परीक्षांमध्ये कॉपी करण्याची अनेक प्रकरणं आणि त्यातले अनेक प्रकार आपल्या कानांवर येत असतात. अशा घटनांना आवर घालण्याचे प्रयत्न आणि आवाहनं होऊनही त्यात बदल घडताना दिसत नसल्याचंच राज्याच नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून समोर आलं आहे. खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी यासंदर्भातला एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला असून हा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा कुठली शाळेतली किंवा कॉलेजची परीक्षा नसून चक्क पोलीस भरती परीक्षेमध्ये हा प्रकार घडल्याचं डीजीपी संजय पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार घडला जळगावमधल्या विवेकानंद प्रतिष्ठान हायस्कूलमध्ये. शनिवारी सकाळी जळगावमध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जात होती. विवेकानंतर प्रतिष्ठान हायस्कूलमध्ये या परीक्षेसाठी केंद्र ठेवण्यात आलं होतं. मात्र, प्रतापसिंग बलोध नावाचा एक परीक्षार्थी संशयास्पदरीत्या हालचाली करत असल्याचं परीक्षकांना जाणवलं. परीक्षेच्या आधीच प्रतापसिंग दोन वेळा स्वच्छतागृहात देखील जाऊन आला होता. त्यामुळे पेलिसांना संशय आला आणि त्यांनी प्रतापसिंगची तपासणी केली.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
demand of One and a half lakh rupees to make peon permanent
चंद्रपूर : धक्कादायक! शिपायास कायमस्वरूपी करण्यासाठी दीड लाख मागितले
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

कॉपीसाठीची शक्कल बघून पोलीसही चक्रावले!

परीक्षेवर देखरेख ठेवण्याचं काम करणाऱ्या कॉन्स्टेबलना त्याचा संशय आल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या कानामध्ये अत्यंत छोट्या आकाराची मायक्रोचिप असल्याचं पोलिसांना आढळून आलं. शिवाय, त्याने पायाला एक ब्लूटूथ डिव्हाईस बसवलं होतं. या यंत्राच्या माध्यमातून फोन रिसीव्ह करण्याची सोय उपलब्ध होती. या मायक्रोचिपच्या माध्यमातून प्रतापसिंगचा मित्र त्याला प्रश्नांची उत्तरं सांगणार होता. पण पेपर सुरू होण्याच्या आधीच प्रतापसिंगचं पितळ उघडं पडलं.

प्रतापसिंग बलोध हा औरंगाबादच्या वैजापूरचा रहिवासी आहे. परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कॉलवर उत्तरं सांगण्याच्या तयारीत असलेल्या त्याच्या मित्राचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत.