scorecardresearch

अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरला ; सरपंच ताब्यात, मुलगा फरार

याप्रकरणी पोलिसांनी सरपंच रंगा पोचा मडावी याला ताब्यात घेतले आहे तर मुलगा फरार आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

गडचिरोली : सरपंचाच्या मुलाने अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गावापासून शंभर मीटर अंतरावर जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथे उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी सरपंच रंगा पोचा मडावी याला ताब्यात घेतले आहे तर मुलगा फरार आहे.भामरागड तालुक्यातील रहिवासी असलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आलापल्ली येथे अकराव्या वर्गात शिक्षण घेत होती. होळीपासून ती गावातच मुक्कामी होती. ती चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत केली होती. तिचा शोध सुरू असतानाच गावापासून शंभर मीटर अंतरावर वडील येर्रा सिडाम यांना मुलीच्या ओढणीचा दुपट्टा दिसला, त्यानंतर चप्पल दिसली. त्यामुळे लागलीच पोलिसांना माहिती देऊन खड्डय़ातील माती काढली असता तिचा मृतदेह आढळला. याप्रकरणी भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या समक्ष दामरंचा पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याची खात्री गावकऱ्यांनी केली. गावचे सरपंच रंगा पोचा मडावी यांच्या मुलाचे आणि सदर मुलीचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती गावचर्चेवरून पोलिसांना मिळाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man buried girlfriend body in the ground after murder zws

ताज्या बातम्या