धक्कादायक! उधार दिलेले पैसे मागितल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या

९ दिवसांनी या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी आरोपी मुकेश गुप्ता याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार आहे.

मयत भोलेनाथ गोस्वामी (३६) हा तरुण उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात रहातो.

उधार दिलेले पैसे परत मागितल्याने मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार वसईत उघड झाला आहे. भोलेनाथ गोस्वामी असे मयत तरुणाचे नाव आहे. ९ दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या जंगलात आढळून आला.

मयत भोलेनाथ गोस्वामी (३६) हा तरुण उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात रहातो. त्याच्याच गावात राहणार्‍या मुकेश गुप्ता या मित्राला त्याने १ लाख रुपये व्याजाने दिले होते. ते पैसे गोस्वामी मुकेशकडे मागत होता. दरम्यान, गोस्वामी रक्षाबंधन सणानिमित्त नाालसोपारा येथे राहणार्‍या मामाच्या घरी आला होता. तेथून २७ ऑगस्ट पासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा तपास नालासोपारा येथील तुळींज पोलीस करत होते.

या तपासादरम्यान पोलिसांनी मुकेश गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गोस्वामीची हत्या करून मृतदहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे गावाजवळ टाकल्याचे सांगितले. हा गुन्हा वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल पाटील यांनी सांगितले की, आरोपी मुकेश गुप्ता याने मयत गोस्वामीकडून एक लाख रुपये घेतले होते. ते परत करण्याच्या बहाण्याने त्याला नायगाव येथे बोलावले. यावेळी गुप्ता याने त्याच्या मित्राला सोबत आणले होते. त्या दोघांनी मद्यपान केले आणि गोस्वामीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगत टाकून दिला. ९ दिवसांनी या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी आरोपी मुकेश गुप्ता याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man killed his friend for not returning borrowed money in vasai vsk