पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना माढा तालुक्यातील व्होळे (खुर्द) या गावात घडली. या गुन्ह्याची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> सोलापूर: नणंदेचा मुलगा दत्तक घेण्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या

Markadwadi repoll
‘EVM विरुद्ध बॅलेट लढाई टळली’,भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी गेली? मारकडवाडीतील फेरनिवडणूक रद्द
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live News Update: Maharashtra Government Swearing-in Ceremony Live Updates|
Maharashtra Government Formation Live Updates : “एकनाथ शिंदेंना…
Can EVM be hacked_ S Chockalingam Answer
ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया
Eknath Shinde and Sanjay raut
Sanjay Raut : “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”, राऊतांच्या दाव्याने खळबळ; सत्ता स्थापनेचा तिढा वाढणार?
Gazetted Civil Services Joint Prelims Exam-2024
MPSC: “तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला…”,, MPSC च्या प्रश्नपत्रिकेत अजब प्रश्न, उमेदवारांचा गोंधळ
Latest Petrol Diesel Price In Marathi
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत बदल; जाणून घ्या मुंबईत काय सुरु आहे दर
Ajit Pawar meeting with Amit Shah
Ajit Pawar: शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांचा दिल्ली दौरा, ‘या’ खात्यावर केला दावा
Deepak Kesarkar eknath shinde devendra fadnavis
मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद, शिवसेनेची नेमकी मागणी काय? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

सोनाली प्रशांत ओहोळ (वय २६) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून तर आत्महत्या केलेल्या पतीचे नाव प्रशांत महादेव ओहोळ (वय ३४) असे आहे. हा धक्कादायक प्रकार प्रशांतची सासरवाडीत म्हणजे सोनालीच्या माहेरी घडला.  याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशांत याने पत्नी सोनाली हिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना  सकाळी उघडकीस येताचा टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> धक्कादायक! मद्यपि चालकामुळे कंडक्टरवर बस चालण्याची वेळ

प्रशांत ओहोळ हा मूळचा मोडनिंब (ता. माढा) येथील रहिवाशी असून वडिलांशी भांडण झाल्याने तो काही महिन्यापासून व्होळे येथे सासरवाडीत राहात होता. दरम्यान, पत्नीचा खून करण्याचे व स्वतः आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.