scorecardresearch

सोलापूर: बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवलं घर; सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भडकली आग

घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोलापुरातील अंबिका नगर, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झालं असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झालंय. श्यामसुंदर भंडारी असं घर पेटवून देणाऱ्या पतीच नाव आहे.

या आगीमध्ये घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने ही आग धुमसतच होती, मात्र योग्यवेळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे मोठी दुर्घटना होताना टाळली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरात चार-पाच दिवसांपासून भांडण सुरू होतं. एकेदिवशी श्यामसुंदर भंडारीने पत्नीला मारहाण करून हाकललं आणि त्यानंतर घराला आग लावली. हा व्यक्ती घरात आग लागून निघून गेला, त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिसरात खळबळ उडाली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, भंडारी यांच्यामुळे घरातील लोकांना त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी दिली. त्यांच्या घरातील भांडणाचा त्रास होत असून तो पत्नी आणि मुलांना मारहाण करत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man sets house on fire in solapur after fighting with wife hrc