धाराशिव: एका किराणा दुकानात खाण्यासाठी कुरकुरे घेण्यासाठी आलेल्या ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका गावात घडली आहे. सदर, घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर, चिमुकलीवर अत्याचाराची घटना ही १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हेही वाचा >>> पत्नीचा गोळी झाडून खून केल्यानंतर पोलीस कर्मचारी ठाण्यात हजर

पिडीत चिमुकली ही खायला कुरकुरे घेण्यासाठी घराबाहेर आली होती, यावेळी नराधमाने तिला घरात बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. तरुणाने अत्याच्यारानंतर सदर घटना बाहेर कोणालाही सांगू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर, पिडीतेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.