ऐसी दिवानगी! त्याने हातावर काढून घेतला रोहित पवारांचा टॅटू; हे पाहून पवारांनी केलं आवाहन, म्हणाले…

रोहित पवार यांनी या कार्यकर्त्याची भेट घेतली तसंच आपल्या इतर कार्यकर्त्यांना एक आवाहनही केलं आहे.

रोहित पवार यांनी आपला कार्यकर्ता पांडुरंग कोरे याची भेट घेतली.

नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, चाहते, समर्थक यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आपल्या लाडक्या नेत्याच्या सभांना आवर्जुन उपस्थित राहणे, आता सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांच्या पोस्ट शेअर करणे, डीपीला त्यांचे फोटो ठेवणे असे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. काही जण तर आपल्या आवडत्या नेत्याचा फोटो, नाव असलेले शर्ट, जॅकेट्सही घालतात. पण एका चाहत्याने मात्र चक्क त्याच्या आवडीच्या नेत्याचा चेहरा चक्क आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा चाहता पांडुरंग कोरे याची ही कमाल आहे. त्याने रोहित पवार यांचा चेहरा आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे. रोहित पवारांनी त्याच्या आपल्यावरच्या प्रेमाची दखल घेत त्याची भेट घेतली. तसंच सोशल मीडियावर त्यांनी पांडुरंगबद्दल एक पोस्टही लिहिली आहे.

या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, पांडुरंग कोरे या भूम तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) युवा कार्यकर्त्याने माझ्यावरील प्रेमापोटी माझा टॅटू हातावर काढला. त्याची आज कर्जतमध्ये भेट झाली. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाबाबत आदरच आहे, पण माझं आवाहन आहे की कार्यकर्त्यांनी लोकहिताची अधिकाधिक कामं केली तर मला अधिक आनंद होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man tattooed ncp mla rohit pawars face on his hand vsk

ताज्या बातम्या