बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण पार पडलं. मात्र या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर एक धक्कादायक प्रकार घडला. पालकमंत्र्यां समोरच एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव विनोद शेळके असं असल्याची माहिती समोर आलीय. दुकानासमोरील खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

बीड पालवन रोड ते पिंपळवाडी या रस्त्याचे बोगस काम झाले असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेळकेंकडून करण्यात आलाय. या रस्त्यामध्ये शेळके यांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यामुळे अनेकदा तक्रारी करुनही ठेकेदारावर कारवाई न केल्याने आज प्रजासत्ताक दिनी शेळके यांनी पालकमंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रकरणामध्ये यंत्रणाचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

“कुठलाही रस्ता हा कोणत्या एका व्यक्तीसाठी नसतो. एखाद्या व्यक्तीला वाटलं की तो रस्ता बोगस होतोय, तर त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या व्यक्तीने इथं येऊन अंगावर रॉकेल टाकून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीने चौकशी करण्याची वनंती करणारं पत्र जरी दिलं असतं. त्या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिलेत,” असं या प्रकरणानंतर बोलताना धनंजय मुंडेंनी सांगितलं.