बीड: ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न; धनंजय मुंडे म्हणतात, “अंगावर रॉकेल टाकून घेण्यापेक्षा…”

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरच घडला हा सर्व प्रकार, यामुळे यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली.

man tries to set himself on fire
पोलीस मैदानावर हा संपूर्ण प्रकार घडला

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण पार पडलं. मात्र या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर एक धक्कादायक प्रकार घडला. पालकमंत्र्यां समोरच एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव विनोद शेळके असं असल्याची माहिती समोर आलीय. दुकानासमोरील खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बीड पालवन रोड ते पिंपळवाडी या रस्त्याचे बोगस काम झाले असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेळकेंकडून करण्यात आलाय. या रस्त्यामध्ये शेळके यांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यामुळे अनेकदा तक्रारी करुनही ठेकेदारावर कारवाई न केल्याने आज प्रजासत्ताक दिनी शेळके यांनी पालकमंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रकरणामध्ये यंत्रणाचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

“कुठलाही रस्ता हा कोणत्या एका व्यक्तीसाठी नसतो. एखाद्या व्यक्तीला वाटलं की तो रस्ता बोगस होतोय, तर त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या व्यक्तीने इथं येऊन अंगावर रॉकेल टाकून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीने चौकशी करण्याची वनंती करणारं पत्र जरी दिलं असतं. त्या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिलेत,” असं या प्रकरणानंतर बोलताना धनंजय मुंडेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man tries to set himself on fire in front of guardian minister of beed dhananjay munde scsg

Next Story
“केंद्राने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही याचा खुलासा केल्यावर..”; देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी