अलिबाग : महिलेल्या रस्त्यात गाठून शरीर संबध ठेवण्याची मागणी करणाऱ्या आणि मागणी मान्य न केल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात न्यायालयात जलदगतीने तपास करून दोषारोप पत्र दाखल केले आहे.
मांडवा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला १६ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास किहीमकडे जाणाऱ्या रस्तावर ही घटना घडली होती. समोरून जात असताना, आरोपी आपल्या काळ्या रंगाची दुचाकी मोटार सायकल वरून तिथे आला. सदर महिलेकडे त्याने माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव, असे बोलून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न केली, तसेच शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली, या सदर महिलेनी प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.
त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम ७४(२), ७८, ७९, ३५१(२)(३), आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा महिला पोलीस हवालदार ए. व्ही. करावडे यांनी तपास करीत आरोपी राहणार परहुरपाडा ता. अलिबाग, जि. रायगड या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. अटकेनंतर २४ तासाच्या आत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र तयार करून दोषपत्र सोबत आरोपी यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.