मांडवा ते मुंबई रो-रो सेवा पुढील रविवारपासून

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सेवेची सुरुवात केली जाणार आहे.

अलिबाग : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागजवळील मांडवा या बहुप्रतीक्षित रो रो सेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या १५ मार्चपासून या सेवेला प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सेवेची सुरुवात केली जाणार आहे.

केंद्र सरकार अंतर्गत मुंबई महानगराला जलवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल आणि जेटी उभारण्यात आली होती. ही सेवा जून २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जलवाहतुकीसाठी बोट उपलब्ध न झाल्याने सेवा रखडली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘प्रोटोपोरस’ नामक बोट गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली. आता सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर ही सेवा १५ मार्चपासून कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे मुंबईतून अलिबागला वाहने घेऊन येणे सहज शक्य होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे टाळणे शक्य होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mandwa to mumbai ro ro ferry service from next sunday zws