एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडलेली आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. दोन्ही पक्ष शिवसेना पक्षावर दावा सांगत आहेत. ही लढाई आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. बुधवारी (५ सप्टेंबर) मुंबईत पार पडलेल्या या दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या दसरा मेळाव्यातही ही लाढाई पाहायला मिळाली. दरम्यान, दोन्ही गटात पक्षवर्चस्वावरून वाद सुरू असताना अंधेरी पूर्व विधानभा पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे कोणते चिन्ह वापरणार यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया, रामदास कदमांचं नाव घेत मनिषा कायंदे म्हणाल्या…

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे समर्थकांकडून गदा या चिन्हाचा वापर केला जाऊ शकतो. तसा अंदाज व्यक्त केला जातोय. यावर बोलताना शिवसेना पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. पक्षचिन्हाबाबत काय होणार? याबाबत कोणालाही माहिती नाही. या सर्व जर तरच्या चर्चा आहेत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास आहे. तरीदेखील निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले तर आम्ही विचार करू. त्यानंतर जे ठरेल ते निश्चितच सार्वजनिक केले जाईल, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केल्याने श्रीकांत शिंदे दुखावले, हात जोडून केली विनंती, म्हणाले “बाळावर माया करणाऱ्या आईचा शाप…”

उद्ध ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांना एकटे पाडू नका, असे आवाहन जयदेव ठाकरे यांनी केले आहे. यावरही मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील तसेच जवळचे लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीत, असे शिंदे गटाला दाखवायचे आहे. त्यांना यातून काहीही मिळणार नाही. एखाद्याच्या कुटुंबात काही विषय असतील तर तुम्ही चव्हाट्यावर आणणार का? असे असेल तर तुमच्याही घरातील विषय बाहेर काढायला हवेत. उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय तिकडे गेले असतील तर तो अंतर्गत विषय आहे. हा राजकीय विषय नाही. त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

हेही वाचा >>> Dasara Melava : सभा सुरु असतानाच केसरकरांना डुलकी? अमोल मिटकरी ट्वीट करत म्हणाले “ते हिंदुत्त्वासाठी…”

दरम्यान, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये पक्षवर्चस्वावरून लढाई सुरू आहे. शिवसेना हा पक्ष कोणाचा? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे? याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. असे असताना सध्या मुंबईसह इतर प्रमुख शहरांमधील महापालिका निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी आपापले पर्यायी पक्षचिन्ह ठरवल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे समर्थक गदा हे चिन्ह वापरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर बुधवारच्या (५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात शिंदे गटाने मंचावर भव्य तलावर आणली होती. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेल्यास शिंदे गटाकडून तलवार या चिन्हाचा वापर होऊ शकतो, असा कयास लावला जातोय.